अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत सुमारे ८ हजार १४० प्रवेश झाल्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे दुसरी फेरी दीर्घ काळ रखडली होती; मात्र राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याच्या सूचना करतानाच २६ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवत दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू केली. या दुसऱ्या फेरीत सुमारे २ हजार ६५० विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले आहे. अशाप्रकारे अतापर्यंत एकूण १० हजार ७९० प्रवेश निश्चित झाले असून, आता तिसऱ्या फेरीसाठी १४ हजार ४८० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासोबतच महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलण्याची संधी देण्यात आली आहे; मात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज भरून सबमिट करण्याची दक्षता घ्यावी, तसेच मार्गदर्शक केंद्र व माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियोजित वेळेत प्रमाणित करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाने केल्या आहेत .
इन्फो
अशी होईल तिसरी फेरी
१० डिसेंबर- नियमित फेरी- ३ साठी रिक्त जागा जाहीर
१० ते १२ डिसेंबर - भाग एक व दोन भरणे, पसंतीक्रम नोंदविणे
१३ ते १४ डिसेंबर - पात्र उमेदवारांसाठी अंतिम गुणवत्ता यादी अंतिम करणे
१५ डिसेंबर - तिसऱ्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करणे
१५ ते १५ डिसेंबर - संधी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे