मालेगाव : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळधारकांविरुद्ध सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १४ अनधिकृत नळधारक अधिकृत करण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख ५ हजार ३२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोडण्या असल्याची बाब उघडकीस आली होती.महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी अनधिकृत नळधारकांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन माळवाड यांनी प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती केली होती.सोमवारी पथकाने चारही प्रभागात कारवाई सुरू केली आहे. १४ अनधिकृत नळधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड वसूल करून नळजोडण्या अधिकृत करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस सातत्याने अनधिकृत नळधारकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. या कारवाईमुळे अनधिकृत नळधारकांचे धाबे दणाणलेआहे.दंड वसूल केल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच अनधिकृत नळधारक कायमस्वरूपी अधिकृत होणार आहे. पाणीपट्टी वसुलीस मदत होणार आहे.
१४ अनधिकृत नळधारकांकडून मालेगावी लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 1:02 AM
मालेगाव : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळधारकांविरुद्ध सोमवारपासून कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १४ अनधिकृत नळधारक अधिकृत करण्यात आले असून, त्यांच्याकडून एक लाख ५ हजार ३२० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देउत्पन्नात वाढ : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून कारवाई सुरू