शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

गिरणा खोऱ्यात १४ टक्के जलसाठा

By admin | Published: September 06, 2015 10:22 PM

दुष्काळ : कसमादेचा पाणीप्रश्न गंभीर

मालेगााव : तालुक्यासह कळवण, बागलाण, चांदवड, नांदगाव, देवळा तालुका दुष्काळाच्या छायेत सापडला असून, या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा खोऱ्यात आॅगस्ट अखेर १४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस न पडल्यास मोठा गंभीर प्रश्न उभा राहण्याची चिन्हे आहेत. येथील गिरणा खोरे त्रुटीचे खोरे म्हणून ओळखले जाते. या खोऱ्यातील भागात गिरणा नदीवर चणकापूर, पुनद व गिरणा हे तीन, तर मोसम नदीवर हरणबारी, आरम नदीवर केळझर, पांझण नदीवर नागासाक्या ही धरणे आहेत. यातील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या गिरणा धरणाचा उपयुक्त साठा १८ हजार ५००, चणकापूरचा २ हजार ७१४, पुनदचा १ हजार ४०४, हरणबारीचा १ हजार १६६, तर नागासाक्या धरणाचा ३९७ असा एकूण २४ हजार ७५३ द.ल.घ.फू. उपयुक्त पाणीसाठा आहे. या सर्व धरणांत आॅगस्टअखेर ३४७३ द.ल.घ.फू. साठा होता. गेल्यावर्षी याच कालावधीत हा साठा ९६४७ फूट होता. त्याची २०१४-१५ची टक्केवारी ३९ होती. आॅगस्टअखेर यातील गिरणा धरणात ६४४, चणकापूरमध्ये १३८३, पुनदमध्ये ६३६, केळझरमध्ये १८८ द.ल.घ.फू. जलसाठा असून, नाग्यासाक्या धरण पूर्णपणे कोरडेठाक असल्याची माहिती आहे. यातील विशेष म्हणजे नाक्यासाक्या धरणात गेल्यावर्षी शून्य साठा होता. या धरणाची टक्केवारी अनुक्रमे ३, ५१, ४५, ५३, ३३ अशी आहे. मागील वर्षी ही टक्केवारी अनुक्रमे २७, ७९, ५४, १०० व ९३ अशी होती. यावरून पाण्याच्या स्थितीची कल्पना येते. परिसरात दिवसेंदिवस तपमानात वाढ होत असून, त्यामुळे या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत असून, अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी आतापासून उपाय योजले जाणे गरजेचे आहे. कसमादेच्या हक्काचे असलेले पाणी काही वर्षांपूर्वी गोदावरी खोऱ्यात पळविण्यात आल्यावर येथील जनतेने व प्रतिनिधींनी त्याविरोधात आवाज न उठविल्याने मांजरपाडा धरणाचे पाणी तालुक्याबाहेर जाणार आहे. वास्तविक हे पाणी येथील जनतेच्या मालकीचे व त्यांच्यासाठीच राखीव होते; मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तसेच जनसामान्यांविषयी कळकळ नसल्याने गिरणा खोरे गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत वावरत असून, येथील शेती उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)