नाशिक : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यामुळे काही अत्यावश्यक कारणांसाठी तसेच अपात्कालीन स्थितीत शहरासह जिल्ह्यात किंवा जिल्हाबाहेर प्रवास करण्याचा प्रसंग ओढावल्यास नाशिककरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कोरोना विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षातून सुमारे १४ हजार ५५९ ‘ई-पासेस’ अद्याप वितरित करण्यात येऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला गेला.लॉकडाउनच्या पाशर््वभूमीवर कोरोना कक्षाचे कामकाज २४ तास सुरू आहे. त्यासाठी २ पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक तसेच ६३ कर्मचारी असे एकूण ८२ अधिकारी-कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला आहे. या कक्षातून गरजूंना तत्काळ ई-पासेसद्वारे प्रवासाची परवानगी आवश्यक माहिती संकलित करताच दिली जाते. यासाठी नागरिकांना कोरोना कक्षाचे विशेष संपर्क क्रमांक (०२५३-२०३५२३३/ ९८२३७८८०७७/ ८८८८८०५१००) तसेच ई-मेल अॅड्रेस देण्यात आला आहे.कोरोना कक्षाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या परवानग्यांमध्ये व्हॉटस्अॅप हेल्पलाईनच्या १२ हजार ५५ वेबलिंकच्या १ हजार ४३७ , तर औद्योगिक १ हजार १६ परवानग्यांचा समावेश आहे. परवानगीसाठी थेट पोलीस आयुक्तालयात धाव घेण्याची नागरिकांना आवश्यकता नसून या कोरोना कक्षात संपर्क साधताच योग्य ती माहिती देत संबंधितांचे प्रबोधन तसेच आवश्यक कारणासाठी परवानगीदेखील दिली जाते. यासह शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक मंडळे तसेच संघटनांना गरजूंपर्यंत अन्नधान्य वाटप करण्यासाठीही परवानग्या प्रदान करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान, भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे. लॉकडाउनमुळे परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील रहिवासी नाशिकमध्ये अडकले असतील, तर त्यांनी घरी जाण्यासाठी कोरोना कक्षासह वेबलिंकद्वारे संपर्क अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आयुक्तालयाच्या कोरोना सेलद्वारे १४ हजार ‘ई-पासेस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 6:46 PM
भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे.
ठळक मुद्देअत्यावश्यक कारणांसाठी प्रवासाची मुभा