शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

14,546 मतदारांनी वापरला नकाराधिकार

By admin | Published: May 27, 2017 1:05 AM

मालेगाव : नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराज असलेल्या १४ हजार ५४६ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला.

 शफीक शेख । लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : एकीकडे प्रशासन निवडणुकीत मतदान मोठ्या संख्येने व्हावे यासाठी प्रयत्न करीत असताना नगरसेवकांच्या कामगिरीवर नाराज असलेल्या शहरातील सुमारे १४ हजार ५४६ मतदारांनी आपला नकाराधिकाराचा वापर केला.मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. काही प्रभागातल्या उमेदवारांनी आणि पक्षांनीही मतदारांना विविध ‘प्रलोभने’ दाखवून मत देण्यासाठी आर्जव केले; मात्र बहुतांश सुजाण सुशिक्षित असलेल्या मतदारात आपापल्या प्रभागात उभ्या असलेल्या ‘उमेदवारां’बाबत चक्क नाराजी व्यक्त केली. काही प्रभागात उमेदवारांनी आपण काम न केल्यास आपल्यावर गुन्हे दाखल करावेत, असे शपथपत्र सादर केले असले तरी त्याचाही काही एक उपयोग झालेला नाही. मतदारांनी नकाराधिकाराचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, निवडणुकीसाठी मैदानात उमेदवार उतरविणाऱ्या राजकीय पक्षांपुढे विचार करायला लावणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे नकाराधिकार वापरणाऱ्यांची संख्या अशीच वाढत गेल्यास पक्षाच्या प्रमुखांनाही उमेदवारी देताना ‘कठोर’ निकष लावावे लागणार आहेत.प्रभाग १० मधील (अ) गटात १५७, (ब) गटात २००, (क) गटात १३५ तर (ड) गटात १३२ मतदारांनी नकाराधिकार वापरला आहे.प्रभाग १ मधील (अ) गटात १७०, (ब) गटात ३४३, (क) गटात १४८ तर (ड) गटात १६८ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला. प्रभाग २ मधील (अ) गटात ७६, (ब) गटात ३१०, (क) गटात २३३ तर (ड) गटात ११२ मतदारांनी उमेदवारांविषयी नापसंती व्यक्त करीत नकाराधिकार वापरला. प्रभाग ३ मधील (अ) गटात १०९, (ब) गटात १८३, (क) गटात ८० तर (ड) गटात १७८ जणांनी नकाराधिकार वापरला. प्रभाग ४ मधील (अ) गटात १००, (ब) गटात १८१ (क) गटात १३२ तर (ड) गटात ९९ मतदारांनी कुणालाही पसंती देणे टाळले.प्रभाग ५ मधील (अ) गटात ९४, (ब) गटात १८२, (क) गटात १२० तर (ड) गटात १९४ मतदारांनी नकाराधिकार वापरला. प्रभाग ६ मध्ये (अ) गटात ११५, (ब) गटात २१०, (क) गटात १४२ तर (ड) गटात ११५ मतदारांनी कोणत्या मतदारांना मतदान केले नाही. प्रभाग ७ मध्ये (अ) गटात १५९, (ब) गटात १८३, (क) गटात ८९ तर (ड) गटात ८८ मतदारांनी आपल्या नकाराधिकाराचा वापर केला. प्रभाग १४ मधील (अ) गटात २१८, (ब) गटात २२२ (क) गटात ८९ तर (ड) गटात २१६ मतदारांनी नकाराधिकाराचा वापरला.प्रभाग १८ मधील (अ) गटात ७१, (ब) गटात १२१ (क) गटात १०६ तर (ड) गटात ९८ मतदारांनी तर प्रभाग २० मधील (अ) गटात ५९, (ब) गटात ८९ (क) गटात २६८ आणि (ड) गटात ७० मतदारांनी आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे. प्रभाग २१ मधील (अ) गटात १४२ (ब) गटात २७५ (क) गटात ७९ तर (ड) गटात २०७ मतदारांनी नकाराधिकार वारपला.