शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

१४९ रेशन दुकानदार बेमुदत संपावर

By admin | Published: August 05, 2016 10:36 PM

१४९ रेशन दुकानदार बेमुदत संपावर

सिन्नर : वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणामसिन्नर : तालुका रास्त भाव दुकानदार व किरकोळ परवानाधारक संघटनेने विविध प्रलंबित माण्यांसाठी १ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. केरोसिन कोटा उचल व वितरण बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या बेमुदत संपात १४९ रेशन दुकानदार व २२५ केरोसिन परवानाधारक सहभागी झाले आहेत. संघटनेचे तालुकाध्यक्ष सदाशिव हगवणे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. तालुक्यातील सर्व परवानाधारक या बंदमध्ये सहभागी झाले असून, विविध प्रश्न सोडविण्याची मागणी जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे व तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. तामिळनाडू राज्याप्रमाणे दुकानदाराला दरमहा कमीत कमी ३५ ते ४० हजार रुपये पगार देण्यात यावा, रॉकेल परवानाधारक पूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, दुकानदाराला धान्य हमाली व भाड्यासहीत दुकानात पोहच पावती मिळावी, गाळाभाडे, वीजबिल, स्टेशनरी खर्च यांची तरतूद करण्यात यावी, दुकानदाराला शासकीय कामाची सक्ती करू नये, दुकानदाराला किराणा व धान्य विक्री करण्याची परवानगी मिळावी. साखरेचा फरक, धान्य, शालेय पोषण आहार ग्रामीण योजना यांचे कमिशन त्वरित मिळावे आदिंसह विविध मागण्या निवेदनात व्यक्त करण्यात आल्या आहेत. तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी तालुकाध्यक्ष सदाशिव हगवणे, तुकाराम जगताप, भगवान जाधव, सुरेश वरंदळ, रंगनाथ बोडके, प्रकाश गुजराथी, बापू थोरात, नवनाथ गडाख, सतीश भुतडा, भास्कर चव्हाणके, बाळू तुपे, आर. डी. तकाटे, बी. बी. सापनर, चंद्रकांत माळी, सुनील कुलकर्णी, बेबीताई खताळे, शीतल घुमरे यांच्यासह महिला बचतगट प्रतिनिधी व परवानाधारक दुकानदार उपस्थित होते. (वार्ताहर)’