नाशिक: अंगणवाडी सेविकेला मदतनीस म्हणून काम करताना दोन वर्षपेक्षा अधिक कालावधी झालेल्या जिल्'ातील 149 मदतनीसाना जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविका महणून पदोन्नती दिली आहे. गुरुवारी या सर्वांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली.या संदर्भात ग्राम विकास विभागाने १३ आॅगस्ट रोजी शासन निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरु करावयाचे असेल तर ग्रामीण, आदिवासी भागातील त्या गावात कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीसला सेवाज्येष्ठतेप्रमाणे शैक्षणिक अर्हता, स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस म्हणून २ वर्षाची सेवा या अटींची पुर्तता करीत असल्यास तिला ‘अंगणवाडी सेविका‘ म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी. असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्'ात आगस्ट अखेर ३१९ अंगणवाडी सेविकांचे रिक्तपदे आहेत. त्यामुळे शासन निर्णयाचा आधार घेऊन याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे यांनी बालविकास अधिकारी व कर्मचारी यांचे कडून युद्ध पातळीवर प्रस्ताव छाननी चे काम करून घेतले. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने अंगणवाडी सेविका पदावर त्याच गावातील वय, अनुभव व शैक्षणिक पात्रताचे आधारे जिल्'ातील १४९ पात्र अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्ती पत्रे दिली. यावेळी जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर, मुख्य कार्यकरी अधिकारी लीना बनसोड, महिला व बालविकास अधिकारी दीपक चाटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, कक्ष अधिकारी राजेंद्र शिंदे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र देसाई, के.व्ही.काळोगे उमेश राजपूत हे उपस्थित होते. (फोटो ल्ल२‘ वर अंगणवाडी)गेल्या ५ वर्षांपासून अंगणवाडी सेविका - मदतनीस भरती व पदोन्नतीवर बंदी होती. आता पदोन्नती प्रक्रिया सुरू झाली असल्याने ५ वर्षानंतर गावपातळीवर सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी वरील अन्याय दूर झालेला आहें.- अश्विनी आहेर, सभापती