ठळक मुद्देएकूण ८२ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.
येवला : शहरासह तालुक्यातील १५ बाधित कोरोनामुक्तहोऊन घरी परतले आहेत, तर अंदरसूल येथील ४३ वर्षीय पुरुषाचा अँटिजेन टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेने नगसूल येथील शिबिरात घेतलेल्या ३८ व बाभूळगाव येथील विलगीरण केंद्रातून घेतलेल्या ४४ अशा एकूण ८२ स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. देशमाने येथील ६० वर्षीय बाधित महिलेचा नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. बाभूळगाव येथील अलगीकरण कक्ष, नगरसूल येथील कोविड हेल्थ सेंटर व नाशिक रुग्णालयातून असे एकूण १५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ७१८ झाली असून, आजपर्यंत ६३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ४० आहे.