त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या प्रसाद योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत आतापर्यंत ३७ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून काही कामे सुरू आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तीनाथ मंदिर दर्शन बारी दालन व मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांसाठी आणखी १५ कोटी मंजूर झाले आहेत.संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची संजीवन समाधी स्थळाला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. समाधी सोहळ्याचे जीर्णोध्दाराचे काम सध्या सुरू आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा पार पडला होता.या कामासाठी त्यांनी २२ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु सदर सरकारने एक रुपयादेखील दिला नसल्याचे तत्कालीन अध्यक्ष पंडितराव कोल्हे यांनी सांगितले. सदर जीर्णोद्धाराचे काम वारकऱ्यांच्या देणगीतून सुरू असून आता उर्वरित काम प्रसाद योजनेतून पूर्ण होणार आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ मंदिरासाठी १५ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:25 PM
त्र्यंबकेश्वर : भारत सरकारच्या प्रसाद योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेंतर्गत आतापर्यंत ३७ कोटी रुपयांची कामे मंजूर झाली असून काही कामे सुरू आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात संत निवृत्तीनाथ मंदिर दर्शन बारी दालन व मंदिर परिसर सुशोभीकरण आदी कामांसाठी आणखी १५ कोटी मंजूर झाले आहेत.
ठळक मुद्देतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीर्णोद्धार भूमिपूजन सोहळा पार पडला होता.