ठळक मुद्देह्यब्रेक द चेनह्ण किराणासह सर्व व्यवहार राहणार बंद
पेठ : तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणेसाठी शुक्रवार (दि.१६) रात्री ८ वाजेपासून पेठ तालुक्यात ३० एप्रिल पर्यंत १५ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून या काळात वैद्यकिय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत.गुरुवारी तहसीलदार संदिप भोसले यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत किराणा असोशिएन, कापड व्यापारी, रेडीमेड व्यावसायीक यांनी स्वयंस्फुर्तीने व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, आरोग्य विस्तार अधिकारी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.