औदाणे : विंचुर प्रकाशा राज्य महामार्गावरील शिंदे पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार-नाशिक आगाराची बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले.तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. रु गणावर ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.नंदुरबारहून नाशिककडे जाणारी बस (एम एच ०७ सी ९१६१) औंदाणेजवळ आली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात धावत्या ट्रक (टी एन ३४, यु ६०२३)ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.बस ट्रकला ठोकली गेल्याने बस चालक गोकुळ बेलदार यांनी जोरदार ब्रेक दाबल्याने बस मधील प्रवाशी पुढच्या सीटांवर आदळल्याने तब्बल १५ जण जखमी झाले.बहुतांशी प्रवाशांना तोंडावर, डोक्यावर आणि हातापायांना जखमा झाल्या आहे. अपघाताचे वृत्त सटाणा आगारात समजताच राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व याच मार्गावरून जात असलेले सटाणा पालिकेचे आरोग्यसभापती दीपक पाकळे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी प्रवाशांना सटाणा ग्रामीण रु ग्णालयात आणण्याची व्यवस्था केली.बसमधील किरकोळ जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांना नाशिक येथे परीक्षेसाठी वेळेत पोहचायचे असल्याने त्यांच्यावर तातडीने प्रथोमोपचार करून त्यांना दुसºया बसमध्ये नाशिककडे रवाना करण्यात आले.अपघातातील जखमी प्रवाशांची नावे - नरेश साहेबराव पाटील (२१ रा.सैताणे ता.नंदुरबार), सतीश सुरेश येवले (३० रा.निजामपूर), विजय अनिल भदाणे (२९ रा.निजामपूर), विशाल वसंत हिवरे (३० रा.तळोदा), ज्ञानेश्वर बबन नागरे (बस वाहक रा.तळवाडे ता.निफाड जि.नाशिक), भारती ज्ञानेश्वर ठाकूर (३२ रा.सामोडा ता.साक्र ी), अर्चना मल्हार पाटील (३५ रा.पिंपळनेर), मल्हार किसनराव पाटील (५२ रा.पिंपळनेर), अरु ण आनंदा ठाकूर (६२ रा.सामोडे), राजमल महारु सोनवणे (३० रा.पिंपळनेर), सुरेखा तुकराम ठाकूर (४०, रा.सामोडा), भटू सायबू देसाई (४२, रा.विजयपूर), ललिता अरु ण ठाकूर (५२ रा.सामोडे) व इतर दोन प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत.
बस-ट्रकच्या अपघातात १५ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 2:58 PM