शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यातील दीड लाख आदिवासींचे खावटी कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 1:53 AM

गेल्या चार वर्षांपासून वसुली होत नाही, या कारणावरून राज्य सरकारने दुर्लक्ष केलेल्या आदिवासींच्या खावटी कर्जाचा भार अखेर आदिवासी विकास महामंडळाच्या प्रयत्नाने हलका करण्यात आला असून, सरकारने जाहीर केलेल्या खावटी कर्ज माफीचा लाभ राज्यातील सुमारे सव्वाअकरा लाख आदिवासींना होणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख आदिवासींचे ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे४० कोटी देणार : नव्याने खावटी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून वसुली होत नाही, या कारणावरून राज्य सरकारने दुर्लक्ष केलेल्या आदिवासींच्या खावटी कर्जाचा भार अखेर आदिवासी विकास महामंडळाच्या प्रयत्नाने हलका करण्यात आला असून, सरकारने जाहीर केलेल्या खावटी कर्ज माफीचा लाभ राज्यातील सुमारे सव्वाअकरा लाख आदिवासींना होणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड लाख आदिवासींचे ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे.आदिवासींची पावसाळ्यात उदरनिर्वाहाची सोय होण्याच्या दृष्टीने त्यांना विकास महामंडळाकडून चार महिन्यांसाठी खावटी कर्जाचे वितरण केले जाते. शिधापत्रिकेवर कुटुंबातील सदस्यांची असलेली संख्या लक्षात घेऊन दोन ते आठ हजार रुपयांपर्यंत खावटी कर्ज वितरण करण्याच्या या योजनेंतर्गत सन २००८मध्ये वाटप केलेल्या कोट्यवधी रुपयांची वसुली होऊ शकली नाही. परिणामी सन २००९ नंतर आदिवासींना खावटी कर्ज देण्यास नकार दिला, उलट राज्यात वाटप ११ लाख २४ हजार ४८० खावटी कर्ज वसुलीसाठी प्रादेशिक व्यवस्थापकांना तगादा लावला होता. सलग दहा वर्षे सुरू असलेल्या या वसुली मोहिमेत जेमतेम ५५,५६८ आदिवासींकडून वसुली होऊशकली.खावटी कर्जापोटी सुमारे पावणेचारशे कोटी रुपये थकल्यामुळे महालेखा परीक्षकांनी विकास महामंडळावर आक्षेप नोंदविले होते. तर दुसरीकडे सरकारकडूनही वसुलीचा तगादा लावण्याबरोबरच आदिवासींना नवीन खावटी कर्ज देण्यासही नकार देण्यात आला होता.दरवर्षी या संदर्भातील पाठपुरावा व सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यात अपयश आले. अखेर आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विनय गोसावी यांनी या संदर्भात शासनाला सविस्तर टिपण सादर केले. त्यात दुर्गम भागातील आदिवासींना कोणत्या परिस्थितीत खावटी कर्जाचे वाटप करण्यात आले, त्याच्या वसुलीसाठी नेमक्या काय अडचणी आहेत व कर्ज वसुलीमुळे सरकारच्या प्रतिमेवर काय फरक पडेल, याबाबतचे सादरीकरण करतानाच तसा प्रस्तावही सादर केला.राज्यातील शेतकºयांना एकीकडे दीड लाखापर्यंत कर्जमाफी मिळत असताना लाखो आदिवासींकडील काही कोटींची रक्कम माफ न केल्यास त्यातून सामाजिक रोष उफाळून येण्याची व त्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.सरकारने दहा वर्षांत पहिल्यांदाच याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन आदिवासींना सन २००८ मध्ये वाटप केलेले ३७९ कोटी ४५ लाख रुपये माफ केले आहेत.पाठपुराव्याला यशसरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील आठही आदिवासी तालुक्यांतील एक लाख ६६,२३४ आदिवासींचे ४० कोटी ७८ लाख रुपये खावटी कर्ज माफ होणार आहे. सन २००८-०९ पासून कर्ज थकीत होते त्याच्या वसुलीसाठी २०१४ पर्यंत प्रयत्न करण्यात आले. अखेर सरकारने ही योजनाच बंद करून टाकली. आता जुने खावटी कर्ज माफ झाल्यामुळे चालू वर्षी आदिवासींना नव्याने खावटी कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आदिवासी विकास महामंडळाने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकSC STअनुसूचित जाती जमाती