सटाणा : प्रवाशी वाहतूक करणाऱ्या अपेरिक्षा मधून सटाणा पोलिसांनी रिक्षासह दीड लाख रूपयांचा देशी-विदेशी मद्यसाठा पकडल्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील ताहाराबाद नाक्यावर करण्यात आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी एका अटक केली असून एक जण फरार आहे.शहराकडुन ताहाराबादच्या दिशेने प्रवाशी वाहतूक करणारी अॅपेरिक्षा (क्रमांक एम.एच.४१ एल. ४४१३) रात्रीच्या सुमाराल निघाली होती. या दरम्यान सटाणा पोलीस ठाण्याचे गस्तीपथक प्रजासत्ताक दिनाच्या पाशर््वभूमीवर ‘’ड्राय डे’’ अवैध दारू विक्र ी करणाºया अड्ड्यांवर छापामारीची मोहीम राबवत होते. या मोहिमेत या प्रवाशी वाहतूक करणाºया रिक्षा चालकाला पोलिसांचे पथक दिसताच क्षणी रिक्षाचा वेग वाढवून बेदरकारपणे रिक्षा चालवून नेली. यामुळे पोलिसांना त्याची हालचाल संशयास्पद आढळून आल्याने पथकाने त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून नाक्यावर पकडले.रिक्षा मालक हा फरार झाला तर रिक्षा चालक तुषार संभाजी भामरे (२९) राहणार आव्हाटी ता.बागलाण याला अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता देशी-विदेशी मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पोलिसांनी रिक्षासह १७ हजार ४७२ रु पये किंमतीची देशी दारु टँगोपंच नावाच्या १८० मिली मापाच्या ३३६ सिलबंद क्वॉटर, प्रत्येकी किंमत ५२ रूपये दराच्या, २६०० रूपये किंमतीची देशी दारु टँगोपंच नावाच्या ९० मिली मापाच्या १०० सिलबंद क्वॉटर प्रत्येकी किंमत २६ रु पये दराच्या, ७ हजार २०० रूपये किंमतीची मॅकडॉल नंबर १ नावाच्या १८० मिली मापाच्या ४८ सिलबंद क्वॉटर प्रत्येकी किंमत १५० रु पये दराच्या १ लाख ५ हजार रु पये किंमतीची अॅपेरिक्षा असा अंदाजे १ लाख ३२ हजार २७२ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) मो.वा.का.३ (१)/१८१,१३०/१७७,१५८,१९२ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सटाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी ही कारवाई केली.
रिक्षामधून पकडला दीड लाखांचा मद्यसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 6:23 PM