ओझर टाउनशीप : येथील मुंबई आग्रा महामार्गावर अवैधरित्या जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा आयशर ट्रक ओझरच्या नागरिकांच्या सहकार्याने ओझर पोलिसांनी महामार्गावर पकडून ट्रक व जनावरे असा एकूण सव्वासहा लाख रूपयांचा माल जप्त केला असून एका इसमास अटक केली आहे .शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन पाटील हे ओझर पोलिसांसह महामार्गावर गस्त घालत असतांना कोकणगांव फाट्यावर फोनवरून मिळालेल्या माहितीनुसार एका आयशर ट्रक मधून (एम एच १५ सीके २६५४ ) गाई व बैल कोंबून पिंपळगांवकडून नाशिककडे जात असल्याचे समजले. त्यामुळे पाटील व पोलिस तेथेच थांबले. आयशर ट्रक फाट्यावर आल्यानंतर त्यांनी चालकास ट्रक थांबवण्यासाठी सांगितले असता चालकाने दुर्लक्ष करीत ट्रक भरधाव वेगाने नेला. पोलिसांनी पाठलाग करून ट्रक ओझर च्या महामार्ग पोलिस चौकीजवळ पकडला. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकबरोबर असलेला सैय्यद शेख रशीद यास अटक केली. तसेच ट्रकसह १५ जनावरे असा सव्वासहा लाख रूपये किंमतीचा माल ताब्यात घेतला.दरम्यान ट्रक चालक ट्रक सोडून पळून गेला. या संदर्भात ओझर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करीतआहेत.बांधलेली जनावरेया ट्रक मध्ये ७ गाई व ८ बैल दोरीने बांधून कोंबलेले आढळून आले. ओझरच्या चार ते पांच नागरिकांच्या सहकार्याने आयशर ट्रक ओझर पोलिस ठाणे येथे आणून १५ जनावरांना ट्रकमधून बाहेर काढले. या ट्रक मध्ये दोन बैल व एक गाय मृतावस्थेत आढळून आले.
१५ जनावरे नेणारा आयशर पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 12:05 AM
मुंबई आग्रा महामार्गावर अवैधरित्या जनावरे कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा आयशर ट्रक ओझरच्या नागरिकांच्या सहकार्याने ओझर पोलिसांनी महामार्गावर पकडून ट्रक व जनावरे असा एकूण सव्वासहा लाख रूपयांचा माल जप्त केला असून एका इसमास अटक केली आहे .
ठळक मुद्देओझर पोलिसांची कामगिरी : एकास अटक, चालक फरार