लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावाघेण्यासाठी मांढरे यांनी आज जिल्'ातील राष्ट्रीयीकृत बॅँकाच्या उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही माहितीदिली. या बैठकीस खासगी, व्यापारी बॅँकेबरोबरच नाशिक जिल्हा मध्यवर्तीसहकारी बॅँकेचे अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी १२ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत बॅँकांना पीक कर्जवितरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतरआत्तापर्यंत दोनशे कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.एकुण ३ हजार ३०३ कोटी रूपयांच्या उदीष्टापैकी २ हजार ४०० कोटी रूपयांचेकर्ज वाटप करण्याची जबाबदारी दहा बॅँकांकडे आहे. १२ आॅगस्ट रोजी झालेल्याबैठकीत बॅँक आॅफ महाराष्ट्रने २७१ कोटी रूपयांचे कर्ज वाटप केले होते तेआत्तापर्यंत ३१८ कोटींवर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एनडीसीसी बॅँकेने२७० कोटी, स्टेट बॅँक आफ इंडीयाने २६५ कोटी, बॅँक आॅफ बडोदाने २६३ कोटी,सेंट्रल बॅँक आफॅ इंडीयाने ७४ कोटी, बॅँक आॅफ इंडीयाने ६६ कोटी, युनीयनबॅँक आॅफ इंडीयाने ११२ कोटी, तर एचडीएफसी बॅँकेने ३ आणि कोटक महिंंद्रा बॅँकेमार्फत सहा कोटी रूपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १५६ कोटी रूपयांची वाढ कर्जवाटपात करण्यात आली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसातच अडीचशे ते तीनशे कोटी रूपयांचे वितरण झालेआहे. इगतपुरी व जिल्ह्याच्या पश्चिम भागात भात, द्राक्ष आदी पिकांसाठीविलंबाने कर्ज वितरण होत असल्याने उर्वरीत कर्ज वितरणाचे उद्दीष्टमहिनाखेरीस पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडशे कोटींचे ज्यादा कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:29 PM
नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल्ह्यातील पीककर्जाचा आढावाघेण्यासाठी मांढरे यांनी आज जिल्'ातील राष्ट्रीयीकृत बॅँकाच्या उच्चपदस्थ अधिका-यांची बैठक घेऊन आढावा घेतला.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : महिनाअखेरीस उद्दीष्टपूर्तीच्या सूचना