नाशिक : महापालिकेच्या कायम कर्मचाºयांसह मानधनावरील एकूण ७५६३ कर्मचाºयांना दिवाळी सणासाठी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२६) केली. याशिवाय, मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सर्व कर्मचाºयांचा वैद्यकीय विमाही काढण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदानामुळे महापालिकेवर ११ कोटी ३४ लाख रुपयांचा बोजा पडणार आहे. दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. सानुग्रह अनुदानावरून सेना-भाजपात पत्रापत्री सुरू असताना महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२६) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक ‘रामायण’वर बोलावित सर्वानुमते यावर्षी मनपा कर्मचाºयांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. मागील वर्षी १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात एक हजाराने वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, मागील वर्षाप्रमाणे यंदाही कर्मचाºयांचा वैद्यकीय विमा काढण्यात येणार आहे.त्यासाठी महापालिका कामगार कल्याण मंडळाच्या निधीतील प्रत्येकी एक हजार रुपयांची रक्कम विम्याच्या प्रीमिअमसाठी वळविण्यात येणार आहे. महापालिकेत एकूण ७५६३ कर्मचारी असून, त्यातील ५१७० कायम कर्मचारी आहेत. १३३४ कर्मचारी हे अंगणवाडी, आरएनटीएस, आरसीएस आणि बूस्टर पंपिंग या विभागातील आहेत. याशिवाय, शिक्षण विभागाच्या १०५९ शिक्षकांनाही या सानुग्रह अनुदानाचा लाभ होणार आहे.एक हजाराने वाढसेना-भाजपाने कर्मचाºयांना यंदा २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. परंतु, महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता आयुक्तांनी गतवर्षाच्या तुलनेत ५०० रुपयांनी वाढ करण्यास मान्यता दिली होती. परंतु, सेना-भाजपाने एकत्रितरीत्या आयुक्तांकडे मागणी करत हजार रुपयांची वाढ पदरात पाडून घेतली. याशिवाय, वैद्यकीय विमाही काढला जाणार असून, कायम कर्मचाºयांना १५ हजार आणि एक हजार रुपये विमा प्रीमिअमचे मिळणार आहेत, तर मानधनावरील कर्मचाºयांना १५ हजार रुपये मिळणार असून, त्यातून त्यांच्या विम्याची रक्कम कापून घेतली जाणार आहे.दसºयापूर्वीच दिवाळीदरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यावरून घोळ सुरू असतो. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपतो त्यावेळी सानुग्रह अनुदानाची घोषणा केली जाते. परंतु, यंदा मात्र, दिवाळी सणाच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा दसºयापूर्वीच झाल्याने कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला. महापौरांनीही पुढाकार घेत त्यात राजकारण न आणता सर्वपक्षीयांना एकत्र आणून प्रश्न मार्गी लावला. मनपाच्या आर्थिक स्थितीमुळे यंदा किती सानुग्रह मिळेल, याची कर्मचाºयांना प्रतीक्षा लागून होती.
मनपा कर्मचाºयांना १५ हजार सानुग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:27 AM