सटाणा : येत्या ७ आॅक्टोबर रोजी होणाºया बागलाण तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्र वारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसी एकूण १४० प्रभागातील ३५२ जागांसाठी ५४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर प्रथमच थेट सरपंचपदाच्या ४० जागांसाठी १५९ इतके विक्र मी उमेदवारी अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्यामुळे तहसील आवारात इच्छुकांनी गर्दी केली होती.तर बहुतांश सरपंचपदाच्या इच्छुकांनी शिक्तप्रदर्शन करत अर्ज भरल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. बागलाण तालुक्यातील तब्बल चाळीस ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. येत्या दोन वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे गल्लीतील राजकारणाचे दिल्लीच्या राजकारणावर परिणाम होत असल्यामुळे या निवडणुकीला देखील महत्व प्राप्त झाले आहे. यंदा प्रथमच थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्यामुळे बागलाण तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे चित्र आहे. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरले. अर्जांची सोमवार दि.२५ सप्टेंबर रोजी छाननी करण्यात येणार असून २७ सप्टेंबरला अर्ज माघारीचा अंतिम दिवस राहणार आहे. दरम्यान बहुतांश सदस्य पदासाठीच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता असून सरपंच पदासाठी गोळवाड ,मळगाव खुर्द येथे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने येथील सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.ग्रामपंचायतनिहाय दाखल केलेले अर्जकंसात सदस्यपदासाठी दाखल अर्जांची संख्या अशी - जायखेडा १३ (४१) , औंदाणे २ (१५) ,वीरगाव ५ (२६) ,पिंपळकोठे ८ (१७) ,आसखेडा ६ (१९),आराई ६ (३२) ,टेंभे खालचे २ (९) ,मुंजवाड ९ (२९) ,मोरेनगर ४ (२२) , वटार २ (१७) ,महड ३ (११) ,गोराणे ५ (१५) ,देवठाण दिगर २ (३) , गोळवाड १ (८) ,चौगाव ४ (२३),भिमखेत ३ (९) ,किकवारी २ (३) , वनोली २ (११) ,माळीवाडा ५ (१७) ,जाखोड ३ (७) ,कातरवेल २ (७) , डोंगरेज ४ (४) ,मळगाव खुर्द १ (२) ,वाघळे ६ (११) ,आनंदपूर ४ (८) , मुंगसे ३ (१३) ,मुल्हेर ४ (३०) ,टेंभे वरचे ८ (८) ,निकवेल २ (१९) ,वाघंबा ४ (५ ),तळवाडे भामेर ७ (१२) ,तिळवण ४ (१२) ,तळवाडे दिगर ३ (९) , तांदुळवाडी ४ (१२) ,मानूर ३ (१०) ,खिरमाणी ४ (११) ,मळगाव तिळवण ३ (९) ,आव्हाटी ४ (१२) ,चौंधाणे २ (२०)
सरपंचाच्या चाळीस जागांसाठी १५९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:02 AM