येवला : तालुक्यातील १६ बाधित गुरूवारी (दि.१५) कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर २० संशयितांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.प्रतीक्षेतील ३७ स्वॅब अहवालात २० संशयितांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात येवला शहरातील ७ तर तालुक्यातील ग्रामीण भागातील १३ बाधितांचा समावेश आहे. नगरसुल येथील डेडीकेटेड हेल्थ सेंटरमधून ७, बाभुळगाव येथील अलगीकरण केंद्रातून ३ तर नशिक रूग्णालयातून ६ असे एकुण १६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील सत्यगाव येथील ८७ वर्षीय महिलेचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ८९८ झाली असून आजपर्यंत ७९६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आतापर्यंत ५० बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित रूग्ण संख्या ५२ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.