लासलगाव : नांदूरमधमेश्वरमध्ये दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबत कार्यवाहीलासलगाव : शहर व विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेकरिता नांदूरमधमेश्वर धरणात दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.लासलगाव, विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेतील लाभार्थी गावांकडे नांदूरमधमेश्वर धरणातील पाण्याशिवाय दुसरा कोणताही जलस्रोत उपलब्ध नाही. धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला असून, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. सोळा गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नांदूरमधमेश्वर धरणात दारणा धरणातून तातडीने पाणी सोडावे, या मागणीचे निवेदन शिवसेना विभागप्रमुख व टाकळी विंचूरचे उपसरपंच शिवा सुराशे यांनी राज्यमंत्री भुसे यांना दिले होते. यावर भुसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून धरणातील पाणी परिस्थितीची पाहणी करून तातडीने नांदूरमधमेश्वर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. (वार्ताहर)
१६ गाव योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश
By admin | Published: March 03, 2016 10:32 PM