नाशिक : तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस मृतदेह शहरातील विविध भागामध्ये सापडले आहेत़ यातील सर्वाधिक मृतदेहांची संख्या ही पंचवटी व गोदाकाठ परिसरातील आहेत़ विशेष म्हणजे बेवारस म्हणून सापडलेल्या अवघ्या तिघांच्याच नातेवाइकांचा शोध लागला आहे़
जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात २०१३ ते जुलै २०१८ या कालावधीत १ हजार ६५२ बेवारस मृतदेहांना नातलगांची प्रतीक्षा होती़ मात्र, अखेरपर्यंत कोणीही नातलग न आल्याने व ओळख न पटल्याने नाशिक महापालिकेने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत़ शहरातील गंगाघाटावर दोन वेळच्या जेवणाची तसेच निवाºयाची मोफत सोय होत असल्याने या ठिकाणी भिक्षेकरी, बेघर व फिरस्ते यांची संख्या मोठी आहे़ या ठिकाणी वास्तव्य करणाºयांना ओळख लपवायचीच असते तसेच त्यांच्याकडे फारसे कुणी लक्षही देत नाही़
बेवारस सापडलेल्या मृतदेहांमध्ये वृद्धांची तसेच आजारपणामुळे मृत्यू झालेल्याची संख्या अधिक आहे़ जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांनी अखेरपर्यंत आपण कोण आहोत, कुठून आलो आहे, आपले नातेवाईक कोण याची माहिती दिलेली नाही़ त्यामुळे शहरातील बेघर, फिरस्ते, भिक्षेकरी यांची माहिती घेण्याची आवश्यकता आहे़
बेवारस मृतदेहाचा सात दिवस सांभाळबेवारस मृतदेह सापडल्यानंतर तो जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात सात दिवसांपर्यंत ठेवला जातो़ पोलिसांचा अहवाल आल्यानंतर या मृतदेहावर नाशिक महापालिका प्रशासनातर्फे अंत्यविधी केला जातो़ यापूर्वी सापडलेल्या बेवारस मृतदेहाचे छायाचित्र, सापडलेल्या वस्तू, अंगावरील ओळखीच्या खुणा यांचे फोटो काढले जातात़ त्यामुळे भविष्यात एखाद्या व्यक्तीने सांगितलेले वर्णन मृतदेहाशी जुळल्यास ओळख पटविणे शक्य होते़घातपातातील मृतदेह बेघर तसेच घातपातातील बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातो़ मात्र, घातपातानंतर ओळख पटविणे शक्य होणार नाही, अशा पद्धतीने मृतदेहाचे विद्रुपीकरण केले जाते़ सिन्नर येथील घाटात एका अनोळखी तरुणीचा मृतदेह फेकण्यात आला होता़ अखेरपर्यंत पोलिसांना या तरुणीचा शोध घेता आला नाही़ तर बेवारस मृतदेहांपैकी आतापर्यंत केवळ तिघांच्याच नातेवाइकांचा शोध लागला असून, त्यांच्या उपस्थितीत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले़
पुनर्वसनाठी प्रयत्नशहरात सापडणारे बेवारस मृतदेह हे जिल्हा रुग्णालयात पाठविले जातात़ यानंतर संबंधित मृतदेह तसेच त्याच्या अंगावरील ओळखीच्या खुणांचे फोटो काढून ओळख पटविण्यासाठी शहरातील माध्यमांकडे प्रकाशित करण्यासाठी दिले जातात़ याबरोबरच नाशिक सिटी पोलिसांच्या संकेतस्थळावरील डेड बॉडीज या ठिकाणी पोलीस ठाणेनिहाय सापडणा-या मृतदेहांची माहिती टाकली जाते़ मे महिन्यात शहरातील विविध ठिकाणचे भिक्षेकरी, लहान मुले, वृद्ध अशा १६४ जणांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिकवर्षनिहाय सापडलेले बेवारस मृतदेह--------------------------------------वर्ष मृतदेहांची संख्या--------------------------------------२०१३ - २८३२०१४ - २८२२०१५ - ३०९२०१६ - ३३३२०१७ - २८०२०१८ (जुलै) - १६५--------------------------------------एकूण १,६५२--------------------------------------