शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

महाविद्यालयातील १७ विद्यार्थिनी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2022 1:28 AM

 पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.

नाशिक :  पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे.महाविद्यालयातील विद्यार्थिनी कोरोनाग्रस्त असल्याच्या वृत्ताला महापालिकेच्या सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंके यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वसतिगृह व्यवस्थापनाने ५२ विद्यार्थिनींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यानंतर मनपा पथकाने वसतिगृहात जाऊन पाहणी केली. ज्या विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्या त्यांना वसतिगृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गरज भासल्यास विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी मनपा कोविड सेंटरमध्ये हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाबाधित आढळून आलेल्या मुली बाहेरगावाहून आलेल्या असल्याचे महाविद्यालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण शंभरीपार !जिल्ह्यात रविवारी (दि.०२) दिवसभरात एकूण ११७ रुग्ण नव्याने बाधित आढळले असून, ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार पोहोचल्याने उपचारार्थी रुग्णसंख्येत मोठी भर पडत असल्याने तीन दिवसांपूर्वी चारशेपर्यंत पोहोचलेली संख्या रविवारी ६९१ पर्यंत पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सलग वाढ होत असताना दिलासा देणारी बाब म्हणजे दिवसभरात एकाही कोरोना बळीची नोंद झालेली नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना प्रलंबित अहवालांच्या संख्येत मात्र लक्षणीय घट झाली असून, ही संख्या १८९ पर्यंत कमी झाली आहे. त्यात नाशिक मनपा १४६, नाशिक ग्रामीण ३२, तर मालेगाव मनपाचे ११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान कोरोनामुक्ततेच्या प्रमाणात पुन्हा अल्पशी घट येऊन ते ९७.७२ टक्के झाले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित संख्येत मोठी वाढ झाल्याने कोराेना उपचारार्थी संख्यादेखील सातशेनजीक अर्थात ६९१ पर्यंत पोहोचली आहे.

इन्फोसलग दुसऱ्या दिवशी शून्य बळी

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी बळींची संख्या शून्य असल्याचा यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच गत आडवडाभरात तीनवेळा कोरोना बळी शून्य राहिले आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना काहीसा दिलासा बळींमध्ये मिळाला असला तरी तो वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कितपत कायम राहील याबाबत साशंकताच आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या