शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

मारहाण करून १७ लाखांची लूट

By admin | Published: June 02, 2015 12:22 AM

पंडित कॉलनीत मध्यरात्रीचा थरार : व्यावसायिकांमध्ये घबराट; पथके रवाना

 नाशिक : मद्यविक्री दुकानांची रोकड एकत्र करून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पाळतीवर असलेल्या सशस्त्र लुटारूंनी रविवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीतील नवीन पंडित कॉलनीत सिनेस्टाइल सतरा लाखांची लूट केली. लुटारूंनी केलेल्या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, लूटमारीच्या या घटनेने व्यापारी, व्यावसायिकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मद्यविक्री व्यावसायिक अतुल मदन हे नवीन पंडित कॉलनीतील ठक्करनगर येथे राहतात. मदन यांचे शहरात चार ते पाच ठिकाणी देशी-विदेशी मद्यविक्रीचे दुकाने आहेत. दररोज रात्री दुकान बंद झाल्यानंतर प्रत्येक दुकानातील रोकड एकत्र करून ती मदन यांच्या घरी पोहोचविली जाते, त्यानुसार रविवारी रात्री मदन यांचा वाहनचालक खंडू लक्ष्मण शिरसाठ (रा. मोरवाडी, सिडको) याने शहरातील विविध ठिकाणांच्या मद्यविक्रीच्या दुकानांमधून १७ लाख ७६ हजारांची रोकड जमा केली व रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो महिंद्रा कंपनीची बोलेरो (एमएच १५ डीके १२६३) या चारचाकीतून मदन यांच्या घराजवळ पोहोचला असतानाच पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने मोटारीला दुचाकी आडवी लावली, त्यावर मोटार थांबताच, कशाचाही विचार न करता लुटारूंनी शिरसाठ याला मोटारीतून बाहेर खेचले व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करतानाच दुसऱ्याने मोटारीतील पैशांची बॅग उचलून आल्या वेगाने ते पसार झाले. दरम्यान, मदन यांच्या घरासमोरच हा प्रकार घडल्याने शिरसाठ याने आरडाओरड करताच परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधत झालेला प्रकार कथन केला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहनचालकाकडून हकिकत जाणून घेत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासचक्रे फिरविली. मात्र, अद्याप लुटारूंपैकी एकाचाही शोध लागला नसून, वाहनचालक शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लुटीमधील संशयितांच्या शोधासाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे तीन स्वतंत्र पथक शहरासह जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. या घटनेतील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून, लवकरच संशयितांना ताब्यात घेण्यात यश येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)