सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरून त्यांची बाहेरगावी विक्री करणाºया तीन संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या दुचाकींची किंमत ८ लाख ६० हजार रुपये आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी दुचाकी विकत घेणाºयांवरदेखील गुन्हे दाखल केले आहेत़अंबड पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. या पथकास चोरी केलेल्या दुचाकी नंबर प्लेट बदलून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव परिसरात व्रिकी केल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजय पवार, शेळके, विष्णू हाळदे, भास्कर मल्ले, दत्तात्रय गवारे, अवी देवरे, विजय वरंदळ, हेमंत अहेर, चंद्रकांत गवळी, मनोहर कोळी यांची टीम चाळीसगावला गेली होती़ पोलिसांनी या संशयितांकडून एफझेड, पल्सर, पॅशन प्रो, मॅस्ट्रो, शाइन अशा विविध कंपन्यांच्या सतरा दुचाकी जप्त केल्या असून त्या अंबड, सातपूर, गंगापूर, मनमाड या ठिकाणांहून चोरल्या होत्या़
संशयितांकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:22 AM