नाशिक : अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी शहरात उघडण्यात आलेल्या २२ अधिकृत केंद्रांवर आज अखेरच्या दिवशी १७ हजार ३६० अर्ज दाखल झाले असून, सुमारे २१०० अर्ज अपुऱ्या माहितीअभावी नाकारण्यात आले. अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी उघडण्यात आलेल्या २१ एआरसी केंद्रांवर प्रवेशअर्ज दाखल केले जात होते. त्यात राखीव गटातून १५,५४२ अर्ज दाखल झाले होते, तर खुल्या गटातून ५१९४ अर्ज दाखल झाले होते. असे एकूण २०७३६ अर्ज दाखल झाले होते. त्याची छाननी झाल्यानंतर २३३ अर्ज पुरेशी माहिती नसल्याने नाकारण्यात आले, तर १९०४ अर्ज पुरेशा प्रक्रियेअभावी बाद करण्यात आले. त्यामुळे एकूण १७३६० जागांसाठी आता प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येईल.१ जुलै रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागेल. त्यावर आक्षेप घेण्यासाठी २ ते ४ जुलै अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी पहिली मेरीट लिस्ट लागेल. त्यानंतर प्रवेशासाठी पहिला कॅप राउंड ७ ते १० जुलैदरम्यान राबविला जाईल. प्रवेशाची पहिली यादी १३ जुलै रोजी लावली जाईल. हे प्रवेश झाल्यानंतर २१ ते २४ जुलैदरम्यान दुसरा कॅप राउंड होईल. हे प्रवेश झाल्यानंतर २७ जुलै रोजी दुसरी प्रवेश यादी लागेल. त्यानंतर १० आॅगस्टला काउन्सिलिंग राउंड होईल. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी १७ हजार ३६० अर्ज दाखल
By admin | Published: June 30, 2015 12:48 AM