देवळा : तालुक्याला खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १७६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध झाला असून, तालुक्यासाठी ५३५ मेट्रिक टन युरियाची मागणी नोंदवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी दिली आहे.खरीप हंगामात दरवर्षी युरियाची टंचाई निर्माण होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी येतात. काही व्यापारी युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्यांच्याकडे शिल्लक असलेला युरिया त्यांच्या नियमित ग्राहकांनाच देण्याचे धोरण अवलंबत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.--------------------या काळात शेतकरीवर्गाला पिकांसाठी युरियाची निकड असल्यामुळे निर्धारित किमतीपेक्षा अधिक पैसे देऊन युरिया घेतात. युरियाच्या विक्रीत पारदर्शकता यावी व शेतकºयांना प्रत्येक दुकानात शिल्लक असलेल्या युरियाबाबत माहिती मिळावी यासाठी खत विक्रे त्यांनी त्यांच्या दुकानातील शिल्लक युरियाबाबतची माहिती फलकावर द्यावी, अशी सूचना विक्र ेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत पवार यांनी दिली आहे.-----------------------शेतकºयांना बांधावर खते व बियाणे उपलब्ध करण्यासाठी कृषी विभाग व पंचायत समिती काम करीत आहे. ज्या शेतकºयांची एकत्रित मागणी असेल तर कृषी सहाय्यकापर्यंत ती मागणी पोहोचवल्यास बांधापर्यंत पसंतीच्या निविष्ठा देण्यात येतील.- सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी
देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १७६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:00 PM