नाशिकरोड : मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी नाशिकरोड विभागात चार नगरसेवक व तीन माजी नगरसेवकांसह एकूण १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आतापर्यंत एकूण २२ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत.मनपा निवडणुकीत बुधवारीदेखील राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने इच्छुकांनी आॅनलाइन उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र राजकीय पक्षाकडून इच्छुक असलेल्यांनी ‘ए व बी’ फॉर्म न मिळाल्याने वेट अॅन्ड वॉच ची भूमिका स्वीकारली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी व इतर पक्षाला आपले बंडखोर इच्छुक आयते उमेदवार मिळू नयेत म्हणून राजकीय पक्ष व विशेषत: भाजपा, शिवसेना विशेष काळजी घेत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहे. शिवसेना व भाजपाकडून पहिली काहीच उमेदवारांची यादी गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्ष बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्याऐवजी शुक्रवारी इच्छुकांना थेट ‘ए व बी’ फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे.१८ उमेदवारी अर्ज दाखलनाशिकरोड विभागात बुधवारी प्रभाग १७ क- राणी मोरे, १७ ड- नरेंद्र रामदास आढाव, प्रभाग १८ अ- नगरसेवक पवन पवार, १८ क - शीतल शिवाजी ताकाटे, मुक्ता बाळासाहेब पोरजे, प्रभाग १८ ड - नगरसेवक अशोक सातभाई, प्रभाग १९ अ- नंदकुमार रामदास आहेर, १९ क- पांडुरंग गुरव, प्रभाग २० अ- माजी नगरसेवक डॉ. राजेंद्र जाधव, नगरसेविका कोमल मेहरोलिया, २१ ब- नगरसेवक रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, २१ ड- शेख अहमद अजीज, प्रभाग २२ अ - सारिका अशोक किर, अमोल आल्हाट, माजी नगरसेवक रामदास सदाफुले, २२ ड - राजेंद्र मंडलिक, चंद्रकांत रघुनाथ साडे या १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ६ दिवसांत एकूण २२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)
नाशिकरोड विभागात १८ अर्ज दाखल
By admin | Published: February 02, 2017 1:13 AM