शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१८ नगरसेवकांचा आरोप : भाजपा सत्तेच्या दहा महिन्यांत केवळ एक काम येवल्यात पथदीपांच्या कामात २२ लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:48 AM

येवला पालिकेत गेल्या दहा महिन्यांपासून भाजपाच्या सत्ताकाळात नव्याने एलइडी स्ट्रीट लाइट बसविण्याचे ३२ लाख ५० हजार रुपयांचे केवळ एकमेव काम झाले. याकामातही २२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप कागदपत्रे दाखवत राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष अशा १८ नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न गुणववा वेशीला टांगली चौकशी करण्याची मागणी

येवला : येवला पालिकेत गेल्या दहा महिन्यांपासून भाजपाच्या सत्ताकाळात नव्याने एलइडी स्ट्रीट लाइट बसविण्याचे ३२ लाख ५० हजार रुपयांचे केवळ एकमेव काम झाले. याकामातही २२ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा सनसनाटी आरोप कागदपत्रे दाखवत राष्ट्रवादी, शिवसेना आणि अपक्ष अशा १८ नगरसेवकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.भाजपाची सत्ता गल्ली ते दिल्ली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभार करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असताना, येवला पालिकेत दिव्याखाली अंधार झाला आहे. येवल्यात एलइडी पथदीप बसविण्याच्या कामात चिनी बनावटीचे दिवे वापरून गुणववा वेशीला टांगली गेली आहे. या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गटनेते डॉ. संकेत शिंदे, शिवसेनेचे गटनेते दयानंद जावळे व अपक्षांचे गटनेते रुपेश लोणारी यांनी १८ नगरसेवकांच्या उपस्थितीत केली आहे. या प्रकारणी मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे कागदपत्रानिशी तक्र ार दाखल करणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन शिंदे, प्रवीण बनकर, निसार शेख, शीतल शिंदे, शेख परवीन निसार, रईसा शेख मुश्ताक, शेख तेहसीन, साबीयाबी मो. सलीम, शिवसेनेच्या नगरसेवक सरोजिनी वखारे, छाया देसाई, किरणबाई जावळे, अपक्ष नगरसेवक सचिन मोरे, अमजद शेख, शफीक शेख, पद्मावती शिंदे, उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पुराव्याची कागदपत्रे सादर करतांना आकडेवारी देखील मांडण्यात आली. येवला नगरपालिकेत सत्तांतर होऊन दहा महिने उलटले तरी अद्याप विकासकामांना सुरुवात झाली नाही. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सत्ताकाळातील निधीसह मंजूर असलेली कामे पूर्ण झाली आहे. भाजपा सत्ताकाळातील एलइडी पथदीप बसविण्याचे ३२.५० लाखांचे काम करण्यात आले. याकामाचे १७.५० लाखाचे पहिले बिलही अदा करण्यात आले. सदरचे काम शिर्डी येथील श्री साई कंट्रोल प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. या कामामध्ये जे एलइडी लाइट बसविण्यात आले आहे ते चिनी बनावटीचे असून, सदर एलइडी दिव्यांची बाजारभावानुसार किंमत १८०० ते २००० रुपये असून, याच कंपनीचे कोटेशन २४०० रुपये दाखविले आहे. येवला नगरपालिकेकरिता मात्र हे दिवे ११७०० रुपये दराने खरेदी करण्यात आले असल्याचे दाखविण्यात आले आहे. याशिवाय खांब व वायर यामध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर फरक दिसून येत आहे. तसेच टेंडर प्रोसेसमधील आणि प्रत्यक्षात असलेली लाइट फिटिंगदेखील व्यवस्थित नाही. शहरातील कॉलनी वसाहतीत अंधार कायम आहे. असे असतानादेखील नगर मनमाड रोडवरील पथदीप चालू करण्याचे काम बाकी असताना, तेच काम त्याच ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, ५० लाख रुपयांचे एलइडी लाइट पुन्हा बसविण्याचा घाट घातला आहे.