शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

जिल्ह्यात १८ लाख वाहने अन‌् पीयूसीची चाचणी केवळ ५ हजार वाहनांचीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:10 AM

नाशिककर दरवर्षी मोठ्या संख्येने दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर आणतात. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, दिवसेंदिवस वाहनांची ...

नाशिककर दरवर्षी मोठ्या संख्येने दुचाकी, चार चाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर आणतात. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या वाढत असून, दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. वाहनांच्या इंधनामधून उत्सर्जित होऊन धुरावाटे वातावरणात मिसळणारा कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डायऑक्साइडसारख्या घातक वायूंचे प्रमाण कमी राहावे, याकरिता वाहनांची पीयूसी चाचणी केली जाते. पीयूसी प्रमाणपत्राची वैधता ही वर्षभरासाठी असते. पीयूसी प्रमाणपत्र मिळविणे हे अत्यंत सोपे व कमी खर्चीक असूनदेखील उदासीन नाशिककरांकडून आपल्या वाहनांची चाचणी करून ते सोबत बाळगले जात नसल्याचे समोर येते. एकूणच प्रदूषणाला आळा घालून नाशिकची ‘हवा’ शुद्ध ठेवण्यासाठी नाशिककरांकडून मात्र कानाडोळा केला जात आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार पीयूसी प्रमाणपत्र जर सोबत नसेल तर कलम-१९०(२) नुसार दंडात्मक कारवाईसाठी संबंधित वाहनचालक पात्र ठरतो. प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोटार निरीक्षकांसह वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.

----इन्फो--

असे आहेत प्रदूषित वाहने तपासणीचे दर

कार- (हलकी वाहने)- ९० ते १२० रुपये

दुचाकी- ३५ रुपये

ट्रक (जड वाहने)- १२० रुपये

---इन्फो--

९४५ गुन्हे दाखल

एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० पर्यंत नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे ५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, ९४५ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच एकूण ९ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

---इन्फो--

वाहन इन्शुरन्स हवाय, मग पीयूसी काढा

वाहन विमा उतरविणाऱ्या सर्वच कंपन्यांकडून वाहनांचा विमा काढताना पीयूसी प्रमाणपत्र आता बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दुचाकीपासून चार चाकी वाहनांपर्यंत ज्या वाहनचालकांना आपल्या वाहनांचा विमा काढायचा असेल त्यांना तत्पूर्वी वैध पीयूसी प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे आता पीयूसी चाचणीचे प्रमाण वाढणार आहे.

---

पॉइंटर्स-

जिल्ह्यातील एकूण वाहने - १७,७७,४७४

जिल्ह्यातील पीयूसी सेंटर- १९८

---

फोटो - ३०पीएचडीसी८७ : पीयूसी चाचणी करताना.

--

डमी फॉरमेट- ३०वेहिकल पीयूसी नावाने. आर वर सेव्ह

क्लीपआर्ट फोटो- ३०व्हेईकल/ व्हेइकल१/ व्हेइकल३ नावाने