एकलहरे, सामनगाव, वीज केंद्र वसाहत, एकलहरेगाव या भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणून जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे, पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदे यांच्या वतीने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची रॅपिड अँटिजेन चाचणी शिबिर घेण्यात आले. ज्या ग्रामस्थांमध्ये कोरोनाची लक्षणे होती अशा ५५ ग्रामस्थांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ ग्रामस्थांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या सर्वांना बिटको हॉस्पिटल नाशिकरोड येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी अनिल जगताप, सागर जाधव, शिवाजी जगताप, राजाभाऊ जाधव, वैद्यकीय अधिकारी किरण कातकाडे, सहायक सतीश अहिरराव, आरोग्य सेवक राहुल पैठणे, सार्थक रोकडे, कमल पगारे, सुषमा घायवटे, शीतल ताडमल आदी उपस्थित होते. (फोटो २० टेस्ट)
एकलहरेत कोरोना चाचणीत १८ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:14 AM