यशस्वी विद्यार्थ्यांना एस. सी. आर. टी., पुणेमार्फत त्यांच्या बँक खात्यावर पारितोषिके आर्थिक स्वरूपात वर्ग केली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके, विस्तार अधिकारी दिलीप पवार यांनी सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांना प्रोत्साहित केले होते. स्पर्धेचे समन्वयक म्हणून दापूर शाळेचे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. सर्वांच्या सहकार्यामुळे गटाचा निकाल उत्तम लागल्याचे मत गटशिक्षणाधिकारी साळुंके यांनी व्यक्त केले.
चौकट- तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल
इयत्ता पहिली/ दुसरी गट भाषण स्पर्धा
१) ईश्वरी शिरसाट २) भविष्या कुदळे ३) ईश्वरी माळी (सर्व एस. जी. पब्लिक स्कूल)
इयत्ता तिसरी / चौथी पत्रलेखन स्पर्धा
१) तृष्णा नाईकवाडी (जि.प. शाळा, बारागाव पिंप्री) २) साईराज गोसावी (जि. प. शाळा, नांदुरशिंगोटे) ३) तन्वी शिंदे (एस. जी. पब्लिक सिन्नर)
इयत्ता सहावी / आठवी स्वलिखीत काव्यवाचन
१) वैष्णवी कोटकर( जि. प. शाळा, मुसळगाव) २) श्वेता तांबे ( जि. प. शाळा, गोंदे) ३) अनुष्का सोनवणे (जि. प. शाळा, गोंदे)
इयत्ता सहावी / आठवी नाट्यछटा एकपात्री
१) दीक्षा गडाख (माध्यमिक विद्यालय, मुसळगाव) २) हर्षल वाकचौरे (माध्यमिक विद्यालय, मुसळगाव) ३) यश भुजबळ (जि. प. शाळा, मुसळगाव)
इयत्ता नववी ते दहावी पोस्टर करणे
१) श्रुती गिते (आदर्श सिन्नर), २) कार्तिक शिंदे ( न्यू इंग्लीश स्कूल, पंचाळे)
इयत्ता नववी ते दहावी निबंध लेखन
१) श्रुती गिते (आदर्श इंग्रजी मीडियम सिन्नर)
इयत्ता पहिली ते बारावी बालसाहित्य इ - संमेलन
१) वृंदा पोखकरकर ( जि. प. शाळा, पांगरी) २) ईश्वरी शिरसाट ( एस. जी. पब्लिक सिन्नर) ३) अंकिता पगार ( जि. प. शाळा, पांगरी ).