नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजजोडणी देण्यासाठीच्या प्रक्रि येला सुरु वात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात परिमंडळात होणाºया ४०९ कोटी रुपये खर्च असलेल्या कामांच्या निविदा महावितरणने प्रसिद्ध केल्या आहेत. यातून जिल्ह्णात २४८ कोटी रु पये किमतीच्या कामातून जवळपास १८ हजार शेतकºयांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे.मार्च-२०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे जोडणी देण्याची योजना आहे. या योजनेतून नाशिक परिमंडळातील २९ हजार ४४० शेतकºयांना थेट फायदा होणार आहे, तर परिसरातील इतर शेतकºयांनाही योजनेतून होणाºया कामांचा लाभ मिळणार आहे. योजनेत एक किंवा दोन, कमाल तीन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलोवॉटचे स्वतंत्र रोहित्र उभारण्यात येणार आहेत.परंपरागत लघुदाब वाहिनीद्वारे दिलेल्या जोडण्यांमध्ये वाहिन्यांची लांबी वाढून गळती वाढते व आकडे टाकून वीजचोरी करण्यास वाव मिळतो. सध्या ६५ व १०० किलोवॉटच्या रोहित्राद्वारे २० ते २५ शेतीपंपांना जोडणी देण्यात येते. या व्यतिरिक्त आकडे टाकून चोºया करण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. परिणामी रोहित्रांवर ताण येऊन वीजपुरवठ्यात अडथळे व रोहित्र जळण्याचे होण्याचे प्रमाण वाढण्यासोबत योग्य दाबाने वीजपुरवठा होत नाही. उच्चदाब वीज वितरण प्रणालीमुळे या सर्वच समस्या दूर करता येणे शक्य होते.उच्चदाबाने थेट वीजपुरवठा केल्याने गळतीच्या प्रमाणात कमालीची घट होईल व याप्रणालीत आकडे टाकता येणार नसल्याने वीजचोरीला आळा बसेल. एका रोहित्रावर किमान एक व कमाल तीन वीजजोडण्या देण्यात येणार असल्याने रोहित्र नादुरु स्त होण्याच्या तक्र ारी दूर होतील, योग्य दाबाने वीजपुरवठा शक्य होणार आहे.पहिले फिरते बिल भरणा केंद्रग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणकडून फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहे. चांदवड उपविभागात याची सुरुवात झाली आहे. -वृत्त - पान ४पंधरा महिन्यांचे ‘लक्ष्य’येत्या पंधरा महिन्यांच्या आत या योजनेतील कामे संपविण्याबाबत सूचना आहेत. शक्य तितक्या लवकर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहर मंडळ कार्यालयांतर्गत ८६ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या २५ कामांची निविदा काढण्यात आली आहे. यातून सहा हजार ३२ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरणप्रणालीद्वारे वीजजोडणी मिळणार आहे, तर मालेगाव मंडळ कार्यालयांतर्गत १६१ कोटी ८८ लाख रु पये किमतीच्या ३४ कामाची निविदा काढण्यात आली असून, यातून ११ हजार ६६१ शेतरकºयांना वीजजोडणी मिळणार आहे.
१८ हजार शेतकऱ्यांना मिळणार उच्चदाब जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:37 AM
नाशिक : हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूश सिस्टम म्हणजेच उच्चदाब वीज वितरण प्रणालीतून शेतकºयांना वीजजोडणी देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १८ हजार शेतकºयांना या प्रणालीचा लाभ होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.
ठळक मुद्देवीज कंपनीची निविदा जाहीर : एचव्हीडीएसमधून होणार २४८ कोटींची कामे