त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाचे प्रमाण जवळ जवळ ओसरत चालले असून सद्या फक्त १० रुग्ण गृह विलगीकरणात असुन आता स्वॅबचे नमुने कुठलेच येणे बाकी नसल्याने लवकरच त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहर यापुर्वीच कोरोना मुक्त झाले आहे.त्र्यंबकला पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जबरदस्त होती. या पार्श्वभूमीवर संभाव्य तिस-या लाटेचा सामना करण्यासाठी त्र्यंबक तालुक्यातील नियोजित ऑक्सिजन प्लाँटची निर्मिती लवकरात व्हावी ही अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.दरम्यान लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. कारण तालुक्यात आत्ता पर्यंत अवघे साडे अठरा हजार लसीकरण झाले आहे.खालील आकडेवारी पाहता ही आआकडेवारी शुक्रवारी (दि.२५) जुन पर्यंतच आहे. कारण लसीकरण रविवारची सुटी वगळता सातत्याने वाढतच असते.झालेले लसीकरण १८ - ४४ एकूण कोव्हीशिल्ड लसीकरण पहिला डोस १११९ दुसरा डोस - ० ४४ च्या पुढील कोव्हीशिल्ड लसीकरणपहिला डोस - ८७१७ दुसरा डोस - २०८५ कोव्हॅक्सीन वयोगट १८ - ४४ पहिला डोस - २०५दुसरा डोस - ४१ कोव्हॅक्सीन वयोगट ४५ च्या पुढीलपहिला डोस - १७८ दुसरा डोस - १४१ एकुण लसीकरण - १८२२२
त्र्यंबक तालुक्यात आतापर्यंत १८५०० लोकांचे लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 4:01 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाचे प्रमाण जवळ जवळ ओसरत चालले असून सद्या फक्त १० रुग्ण गृह विलगीकरणात असुन आता स्वॅबचे नमुने कुठलेच येणे बाकी नसल्याने लवकरच त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना मुक्त होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहर यापुर्वीच कोरोना मुक्त झाले आहे.
ठळक मुद्देलसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे.