शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

धरणांमध्ये अवघा १९ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:02 AM

जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली

नाशिक : जिल्ह्यात तीन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढल्यानंतर पुन्हा उष्णतेच्या पाऱ्याने ३८ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर शहरी भागासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली असून, एप्रिलच्या तिसºया आठवड्यातच जिल्ह्णातील धरणांतील पाणीसाठा जेमतेम १९ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्णातील ८६५ गावांना २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा जिल्ह्णात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्णातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्णात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा, सुरगाणा व येवला या आठ तालुक्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर हेच प्रमाण ३३ टक्के इतके होते. शिवाय मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन धरणातून सोडण्यात येणार आहे.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात २८ टक्के, तर समूहात २९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, तिसगावमध्ये दोन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता आठ तालुक्यांतील १९२ गावे व ६७३ वाड्या अशा ८६५ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने २३८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ९३ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात टॅँकरच्या संख्येने सव्वा दोनशेचा आकडा ओलांडला आहे.तालुकानिहाय टॅँकरबागलाण- ३३, चांदवड- ११, देवळा- ९, मालेगाव- ३९, नांदगाव- ५१, सुरगाणा- ३, सिन्नर- ५१, येवला तालुक्याला ४१ टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी