लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात सोमवारी (दि. ८) एकूण १९३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १६५ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान, नाशिक मनपा, मालेगाव मनपा तर ग्रामीणला प्रत्येकी एक असे तीन मृत्यू झाले असल्याने, आतापर्यंतच्या बळींची संख्या २,०६२ वर पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ९९३ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख १३ हजार ७८७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १,१४४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९७.२६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९८, नाशिक ग्रामीण ९६.२५, मालेगाव शहरात ९३.१२, तर जिल्हाबाह्य ९४.८३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ९ हजार ३६० असून, त्यातील ३ लाख ९१ हजार ७६३ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १६ हजार ९९३ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६०४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.