लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मिशन झिरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या आठव्या दिवशी १९७४ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यापैकी २३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.महानगरपालिकेने आखून दिलेल्या पुढील ठिकाणी बिडीकामगार नगर, खेतवानी लॉन्स, सिडको रामवाडी-हनुमानवाडी, उत्तमनगर, कालिका मंदिर-दत्त चौक-विजयनगर, सिद्धार्थनगर, कामगारनगर, काशी माळी मंगल कार्यालय सातपूर, मौले हॉल सातपूर, संजयनगर-वाल्मिकनगर, फुलेनगर, राजीवनगर, लामखेडे मळा-तारवालानगर, सुंदरनगर देवळाली गाव, कर्णनगर पंचवटी, सह्याद्रीनगर मोरवाडी, सिन्नर फाटा नाशिकरोड, टाकळी समतानगर, वडाळागाव आंबेडकर चौक, सातपूर कॉलनी, शिवशक्ती चौक, कामटवाडा, खोडदेनगर, खुटवडनगर, पंचक जेलरोड, शिखरेवाडी नाशिक रोड, स्वारबाबा नगर मारु ती चौक सातपूर, हनुमान मंदिर सातपूर कॉलनी या ठिकाणी २५ मोबाइल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे रुग्ण तपासणी व अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. मिशन झिरोअंतर्गत आठ दिवसांमध्ये १२५६७ अॅँटिजेन टेस्ट होऊन १२१३ कोरोनाबाधित शोधून काढत त्यांच्याकडून होणाऱ्या प्रसाराला रोखण्यात मोलाची भूमिका सातत्यपूर्ण योगदान देत आहे.
दिवसभरात १९७४ अॅँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:07 PM
नाशिक : महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व विविध स्वयंसेवी व्यक्ती, संघटना यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मिशन झिरो नाशिक या एकात्मिक कृती योजनेच्या आठव्या दिवशी १९७४ नागरिकांनी आपल्या अँटिजेन चाचण्या करून घेतल्यात. त्यापैकी २३५ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
ठळक मुद्दे मिशन झिरोअंतर्गत आठ दिवसांमध्ये १२५६७ अॅँटिजेन टेस्ट