मालेगाव : येथील स्विस हायस्कूलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या हेतूने २ लाख रुपये किमतीची बांधून ठेवलेली १२ जनावरे अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केली आहे. याप्रकरणी आवेशखान साबीरखान या तरूणाविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेशखान साबीरखान याने कत्तलीच्या हेतूने १२ जनावरे निर्दयतेने जखडून ठेवल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली होती. पथकाने छापा टाकून जनावरे जप्त केली आहेत.अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांना अटकमालेगाव शहरालगतच्या मरीमाता मंदिर परिसरातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाºया ज्ञानेश्वर बापू जाधव रा. चंदनपुरी, संतोष कृष्णा गवळी रा. बजरंगवाडी या दोघांना किल्ला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली व दोन हजार रुपये किमतीची वाळू असा २ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महिलेचा विनयभंग करणाºया दोघांना अटकमालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातील रोकडोबानगर परिसरातील शेतात महिलेचा विनयभंग करून मारहाण करणाºया मन्साराम उत्तम सोनवणे, अभिमन ऊर्फ आबा मधुकर गायकवाड दोघे रा. रोकडोबानगर या दोघांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सदर महिला वस्तीलगतच्या शेतात गेली असता मन्साराम सोनवणे व अभिमन गायकवाड याने विनयभंग करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कत्तलीसाठी आणलेली १२ जनावरे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 11:20 PM