नाशिक : मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघासाठी ४,५७९ इतकी मतदान केंद्रे असून, त्यामध्ये १३३ साहाय्यकारी मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ६५ इतकी आहे. शहरी आणि ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मतदान केंद्रांवर निवडणूक होणार असल्याने यासाठी ईव्हीएमची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे यंदाही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन्स आणि निवडणूक कर्मचाऱ्यांची वाहतूक केली जाणार आहे. निवडणूक शाखेकडून मतदारसंघनिहाय बसेसचे नियोजन करून त्यानुसार ५२० बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश महामंडळाला दिले आहेत.निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील १३ डेपोंमधून या बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार नाशिक पूर्वसाठी ३०, मध्य नाशिकसाठी १८, नाशिक पश्चिमसाठी ५७, देवळाली ३७, मालेगाव मध्य १९, मालेगाव बाह्य ३७, बागलाण २१, कळवण ४०, चांदवड ३८, नांदगाव ४२, येवला ४१, सिन्नर ४४, निफाड ३६, इगतपुरी २७, तर दिंडोरी २६ याप्रमाणे बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.निवडणुकीसाठी विविध खात्यांमधील सुमारे ३० हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागणार आहे, तर कर्मचारी आणि मतदान केंद्रांची संख्या पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य देण्यात आले आहे. शक्यतो आदिवासी दुर्गम भागात बसेसचा उपयोग प्राधान्याने करावा लागणार आहे. या वाहनांबरोबरच पोलीस बंदोबस्तातील काही खासगी वाहनांचादेखील प्रसंगी समावेश केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक शाखेने मागणी केलेल्या बसेसपेक्षा काही बसेस अतिरिक्त ठेवण्यात येणार आहेत. तातडीची गरज म्हणून या बसेस तैनात केल्या जाणार आहेत. चालकांना या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या असून, निवडणुकीच्या दिवशी आणि आदल्या दिवशी चालकांना सुटी घेऊ नये, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.चालकांना मतदानाला देणार प्राधान्यमतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन्स घेऊन जाण्यासाठी लागणाºया बसेसचे जे चालक आहेत त्यांना बसेस घेऊन जाण्यापूर्वी आपापल्या मतदारसंघात मतदान करून घेण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबतच्या सूचना निवडणूक शाखेकडून दिल्या जाणार आहेत.४जिल्हाभरातील चालक या बसेससाठी लागणार आहेत. त्यामुळे या चालकांना लवकरात लवकर कसे मतदान करून घेता येईल यासाठी महामंडळाच्या अधिकाºयांनीदेखील चालकांना सूचना देण्याचे आवाहन निवडणूक शाखेने केले आहे.
निवडणुकीसाठी ५०० बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:24 AM
मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५२० बसेस धावणार आहेत. जीपीएसप्रणाली आणि शक्यतो एक दरवाजा असलेल्या बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरण्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.
ठळक मुद्देनिवडणूक शाखा : ‘जीपीएस’प्रणाली असणाऱ्या बसेस घेणार