लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला.या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. ३६ व्या गाळप हंगाम सांगता समारंभप्रसंगी केन यार्ड विभागाचे कर्मचारी समाधान गायकवाड यांच्या हस्ते सपत्निक गव्हाण पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संजय खरात, आबासाहेब खारे, संदीप खारे, तांत्रिक व्यवस्थापक देसाई, जनरल मॅनेजर पठाण, चीफ केमिस्ट सूर्यवंशी, स्थापत्य अभियंता कुबेर जाधव, कोजन इन्चार्ज संतोष कचोर, युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, युनियन सदस्य दीपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे मुख्य लेखापाल कोर, आसवणी विभागाचे अधिकारी काळे, शेतकी अधिकारी साळुंखे, भिवराज सोनवणे, सुरक्षा अधिकारी किरण आहिरे, कृष्णा पाटील, नीलेश पाटील, ओ. एस. शेवाळे, राजू बोरसे, नंदकिशोर जाधव, अक्षय पाटील, गणेश रणदिवे, नवल भगत, साहेबराव झाल्टे, सुनील तुपे, सुनील पवार, देविदास शेवाळे, सूरज पवार, जावळीकर मोरे, आदी उपस्थित होते.गाळपामध्ये अडचणीया वर्षी नाशिक जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात व कार्यक्षेत्राबाहेर मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध होता. अजूनही निफाड, इगतपुरी परिसरात ऊस उभा आहे. मात्र धाराशिव संचलित वसाकासाठी कार्यक्षेत्राबाहेरून ऊस उपलब्ध करून गाळप करणे दिवसेंदिवस जिकिरीचे होत असल्याने तसेच मजूर टंचाई व ऊस वाहतुकीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे जास्त दिवस कारखाना चालू ठेवणे सयुक्तिक नसल्याने कारखान्याचे गाळप बंद करावे लागले. हाफ सीझनमध्ये सर्व काम पूर्ण करून तसेच कार्यक्षेत्रात दौरे आयोजित करून पुढच्या वर्षी पाच लाख गाळपासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे यावेळी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
वसाकात २ लाख मे. टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:46 PM
लोहोणेर : धाराशिव संचलित वसाका या कारखान्याच्या ३६ व्या गाळप हंगामाची बुधवारी (दि. ३०) सांगता झाली. या गाळप हंगामात २ लाख २ हजार ५०० मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यातून १ लाख ९४ हजार क्विंटल साखरनिर्मिती होऊन सरासरी साखर उतारा ९.६० टक्के मिळाला.
ठळक मुद्देहंगामाची सांगता : सरासरी साखर उतारा ९.६० टक्के