चांदवड : तालुक्यातील मालसाणे, वडाळीभोई, बहादुरी, धोंडगव्हाण येथील १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी रेल्वेने गेले असता कोलकाता येथेच अडकून पडले असून, आम्हाला तातडीने आमच्या गावी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे एका पत्राने केली आहे.तालुक्यातील विविध गावाचे १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी दि. १५ मार्च २० रोजी निघाले होते. ते दि. २० मार्चला कोलकाता शहरात पोहोचले, त्यानंतर सर्व रेल्वे गाड्या बंद होऊन देशभर संचारबंदी लागू झाली. त्यामुळे आम्हाला नाशिक जिल्ह्यात येता येत नाही तर ते कोलकाता, इच्छापूर, प्रणवनंदास माती आश्रम, शांतिनगर मौलाना आझाद रोड, लयापूर कोलकाता येथे अडकून पडले. ते गेल्या दहा दिवसांपासून विवंचनेत असल्याचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना पाठविले.सदरच्या पत्राची प्रत चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याकडे पाठविली आहे. कासलीवाल यांनी सदरचे पत्र फडवणीस यांना विनंतीसाठी पाठविले आहे. या तेरा जणांमध्ये लक्ष्मण एकनाथ कासार, सिंधूबाई लक्ष्मण कासार रा. मालसाणे, ता. चांदवड, नामदेव महादू जाधव, आशा नामदेव जाधव, राजेंद्र नामदेव बागुल, शोभा राजेंद्र बागुल रा. वडाळीभोई, ता. चांदवड, लता मनोहर आहेर रा. वाळुंज खाकुर्डी, अहमदनगर, अशोक फकिरा गारे बहादुरी, ता.चांदवड, राजाराम पाखरु बोरस्ते, धोंडगव्हाण ता. चांदवड, दौलतराव कोंडाजी जाधव रा. धोतरखेडे ता. चांदवड, अशोक श्रीहरी शिंदे बदलापूर, जि. ठाणे, शोभा अशोक शिंदे, बदलापूर, जि. ठाणे, सुनंदा दौलतराव जाधव रा. वडाळीभोई, ता. चांदवड अशी त्यांची नावे आहेत.
चांदवडचे १३ भाविक कोलकात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 9:41 PM
चांदवड : तालुक्यातील मालसाणे, वडाळीभोई, बहादुरी, धोंडगव्हाण येथील १३ भाविक दोन धाम यात्रेसाठी रेल्वेने गेले असता कोलकाता येथेच अडकून पडले असून, आम्हाला तातडीने आमच्या गावी पोहोचवावे अशी मागणी त्यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्याकडे एका पत्राने केली आहे.
ठळक मुद्देगेल्या दहा दिवसांपासून विवंचनेत असल्याचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना पाठविले.