नाशिक : कोरोनाचे संकट आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेेले मराठा आरक्षण यामुळे रखडलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यानंतर शनिवारी (दि.५) दुसऱ्या फेरीसाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या गुणवत्ता यादीत तब्बल दोन हजार ८८४ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, १ ते १० पसंतीक्रमांमध्ये एकूण ६ हजार ७६९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यातील दुसऱ्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे ऐच्छिक असून, असे विद्यार्थी पुढील फेरीत सहभागी होऊ शकणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
अकरावी प्रवेशासाठी शनिवारी (दि. ५) जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत शहरातील ६ हजार ७६९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यात कला शाखेचे १ हजार २६४, वाणिज्य शाखेचे २ हजार ३३४, तर विज्ञान शाखेच्या ३ हजार ४८, तर एमसीव्हीसीच्या १२३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीसाठी २३ हजार ३९२ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील ६ हजार ७६९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत नाशिक शहरातील विविध महाविद्यालयांसाठी १२ हजार ९५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती, यातील ८ हजार १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले, तर दुसऱ्या फेरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ९ डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
शाखा विद्यार्थी संख्या
कला : १ हजार २६४
वाणिज्य : २ हजार ३३४.
विज्ञान : ३ हजार ४८.
एमसीव्हीसी : १२३
-------
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
- ५ ते ९ डिसेंबर : विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेणे
- १० डिसेंबर : तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा अहवाल सादर करणे
- ५ डिसेंबर : दुसऱ्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे
इन्फो -
खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ
पंचवटी महाविद्यालय
शाखा कट ऑफ ( %)
कला ७५
मराठी वाणिज्य अनुदानित ७६
विज्ञान अनुदानित ९१
विज्ञान विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्य ८७
विज्ञान विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्य ८२
बिटको नाशिकरोड महाविद्यालय
कला ७५
मराठी वाणिज्य अनुदानित ८०
इंग्रजी वाणिज्य अनुदानित ९०
वाणिज्य स्वयंअर्थसाहाय्य ८७
विज्ञान अनुदानित ९३
विज्ञान विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्य ८६
एचपीटी, आरवायके कनिष्ठ महाविद्यालय
कला ८९
विज्ञान ९५
विज्ञान विनाअनुदानित ९३
बीवायके कनिष्ठ महाविद्यालय
वाणिज्य अनुदानित ९४
वाणिज्य विनाअनुदानित ९४
केव्हीएन नाईक कनिष्ठ महाविद्यालय
कला ७६
वाणिज्य ७७
विज्ञान ९३
विज्ञान स्वयंअर्थसाहाय्य ९३
भोसला मिलिटरी कॉलेज
कला ८०
मराठी वाणिज्य अनुदानित ८२
इंग्रजी वाणिज्य अनुदानित ९०
विज्ञान ९२
केटीएचएम कनिष्ठ महाविद्यालय
कला ८०
मराठी वाणिज्य अनुदानित ८४
इंग्रजी वाणिज्य अनुदानित ९१
इंग्रजी वाणिज्य विनाअनुदानित ८०
विज्ञान अनुदानित ९४
विज्ञान विनाअनुदानित ९३
विज्ञान विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्य ८९