आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीकडून या कामांना मंजुरी मिळाली आहे. सरपंच शीला सतीश कोकाटे, उपसरपंच आशा रवींद्र ठोक, सदस्य रंगनाथ कोकाटे, सागर कोकाटे, शरद कोकाटे, कल्पना ठोक यांच्या मागणीची दखल घेतल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत आहे. खडांगळी शिवारातील रोहित्रांवर अधिकृत कनेक्शनधारकांचा विजेचा भार हा सध्या अस्तित्वात असलेल्या रोहित्रांच्या क्षमतेपेक्षा अधिक होता. त्यामुळे रब्बी हंगामात पिकांचे सिंचन करताना नेहमीच ट्रान्सफॉर्मर जळत असे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस येत असे. शेतकऱ्यांची ही समस्या सामाजिक कार्यकर्ते सतीश कोकाटे यांच्यामार्फत सरपंच शीला कोकाटे, उपसरपंच आशा रवींद्र ठोक व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्याकडे मांडून ती सोडविण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाढीव ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यासाठी प्रस्ताव बनविण्याचे आदेश दिले. त्यानुसारे, बनविलेल्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली.
इन्फो...
येथे बसविणार ट्रान्सफार्मर
म्हसोबा ट्रान्सफॉर्मरवर जादा लोड झाल्याने, त्यावर आणखी एक १००चा ट्रान्सफॉर्मर होणार आहे. त्यासाठी पाच लाख ५३ हजार रुपये निधी, सोमठाणे रोडवरील रुंजा महादू ठोक द्राक्षबागेजवळील सध्या असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढल्याने, त्यावर एक नवीन १००चा ट्रान्सफॉर्मरला तीन लाख ७१ हजार रुपये, वेणूबाई वस्तीवरील ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढल्यानेे, त्यावर एक नवीन १००चा ट्रान्सफॉर्मरला चार लाख ९७ हजार रुपये, गावठाण हद्दीत ७५ किलोवॅट क्षमतेचे सिंगल फेजचे स्वतंत्र अजून एक डीपी मंजूर झाली आहे. त्यासाठी पाच लाख ६१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.