शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

२० हजार स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 12:25 AM

नाशिक : दरवर्षी नाशिकमधील निफाड येथील चापडगाव शिवारातील नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यात गुलाबी थंडी जाणवू लागताच स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. पक्षी प्रगणनेअंतर्गत विविध प्रजातींच्या सुमारे २० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास ...

ठळक मुद्देनांदूरमधमेश्वर अभयारण्य : हिवाळी संमेलनासाठी विविध पक्ष्यांची गर्दी; वन्यजीव विभागाकडून प्रगणना

नाशिक : दरवर्षी नाशिकमधील निफाड येथील चापडगाव शिवारातील नांदूरमधमेश्वर राष्टÑीय पक्षी अभयारण्यात गुलाबी थंडी जाणवू लागताच स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्याने नांदूरमधमेश्वर अभयारण्यात किलबिलाट ऐकू येऊ लागला आहे. पक्षी प्रगणनेअंतर्गत विविध प्रजातींच्या सुमारे २० हजार ६९१ पक्ष्यांचा अभयारण्यामधील पाणथळ व गवताळ जागेत अधिवास आढळून आल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.अभयारण्य परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे यावर्षी लवकरच गजबजले. त्यामुळे वन्यजीव नांदूरमधमेश्वर अभयारण्य कार्यालयाच्या वतीने नुकतीच पक्षी प्रगणना विविध पक्षिमित्र व वन्यजीव अभ्यासकांच्या मदतीने वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. जलाशयाच्या पाणथळ जागेत १९ हजार ४०५, तर परिसरातील गवताळ प्रदेशात तसेच वृक्षराजीवर एक हजार २८६ असे एकूण २० हजार ६९१ पक्ष्यांची मोजदाद करण्यास यश आले. दुर्बिणी, टेलिस्कोपच्या सहाय्याने अभयारण्यक्षेत्रांतील विविध निरीक्षण मनोºयांवरून पक्षिमित्रांनी गणना पूर्ण केली. जलाशयाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, भरपूर खाद्य उपलब्ध झाल्याने पक्ष्यांच्या आगमनाला गती मिळाली आहे. आॅक्टोबरच्या पंधरवड्यापर्यंत अभयारण्य पूर्णपणे विविध देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजलेले पहावयास मिळणार आहे.हिवाळ्यात महाराष्टÑाचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या या अभयारण्यात मोठ्या संख्येने पक्ष्यांची जत्रा भरते. पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी पक्षिप्रेमींची पावले गुलाबी थंडीत अभयारण्याच्या दिशेने वळतात. अभयारण्य पक्षिप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून, विविध निरीक्षण मनोरे व त्यापर्यंत जाणाºया पायवाटांसह नेचर ट्रेलची डागडुजी करण्याची गरज आहे. तसेत प्रसाधनगृहांची स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून हिवाळ्याच्या हंगामात येणाºया पर्यटकांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल. वनपरीक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, वनरक्षक चंद्रमणी तांबे, ज्येष्ठ पक्षिमित्र दत्ता उगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभयारण्यात प्रगणना पार पडली.यजमान दाखल; पाहुण्यांची प्रतीक्षाथापट्या, कापशी बदक, तरंग, गढवाल, छोटा मारल बदक, चित्रबलाक, पांढºया मानेचा करकोचा, मालगुजा, दलदली ससाणा, मॉँटेग्यू ससाणा, शेकाट्या, उघड्या चोचीचा करकोचा, भुवई बदक, केकर, छोटा आर्ली, टिबुकली, नकटा बदक, ठिपकेवाला गरुड, चमचा बदक, नदी सूरय, तलवार बदक असे देशी स्थलांतरित पक्षी अभयारण्यात दाखल झाले आहेत. यजमान म्हणून ते येणाºया विदेशी पाहुण्यांसाठी जणू आदरातिथ्यची तयारी करत असावे. लवकरच विदेशी पक्ष्यांचेही आगमन होण्याचे चिन्हे आहेत.