पेठ : घर तेथे वीजमीटर या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील ग्राहकांसाठी महावितरण कंपनीने २०० रुपयात नवीन घरगुती वीज जोडण्या देण्याची योजना सुरू केली असून, पेठ उपविभागात जवळपास १२०० ग्राहकांना नवीन जोडणी देण्यात आली आहे.पेठ येथे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आदिवासी ग्राहकांना घरगुती वीज जोडणी मीटरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता सुदर्शनपगार, पेठ उपविभागाचे रोशन धनवीर, बाचणीवाल, शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गिरीश गावित, नगरसेवक गणेश गावित यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी ग्राहकांना २०० रु पयात वीजमीटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 11:51 PM