नाशिक : जिल्ह्यात बुधवारी नवीन ४०३ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून, २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ६ बाधितांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या १८०४ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात बुधवारी (दि. २९) आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ८२२ वर पोहोचली असून, त्यातील ९६ हजार ९९६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३०२२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.२६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.२६, नाशिक ग्रामीणला ९३.३९, मालेगाव शहरात ९३.०६, तर जिल्हाबाह्य ९२.१९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३०२२ बाधितांमध्ये १५९६ रुग्ण नाशिक शहरात, १२७१ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३१ रुग्ण मालेगावमध्ये, तर २४ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ८४ हजार ४०५ वर पाेहोचली असून, ६०६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
-------