पंचवटी : नाशिक पोलीस मुथूट दरोडा प्रकरणाचा तपास करीत असतानाच शुक्रवारी (दि.२८) शहरातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला अडवत साडेएकवीस लाख रुपयांची लूट केली आहे. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर अशाप्रकारे लूट करून चोरट्यांनी नाशिक पोलिसांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूररोड परिसरात राहणाºया सुयोग धूत यांचे रविवार कारंजा येथे धूत ट्रेडर्स किराणा, कॉस्मेटिक होलसेल दुकान आहे. ते शुक्रवारी सायंकाळी दुकानातील काम आटोपून साडेएकवीस लाख रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन स्विफ्टमधून (वाहन क्रमांक-एमएच १५, जीएल ८८११) घराकडे जाण्यासाठी निघाल्यानंतर पंचवटी कारंजावर असलेल्या ट्रॅव्हल्स दुकानात गेले. त्यानंतर ते मालेगाव स्टॅण्डमार्गे चिंचबन उताराने जात असताना चिन्मय मिशन केंद्रासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूत यांच्या कारला गाडी आडवी मारीत तुम्ही आम्हाला कट का मारला, असा सवाल करीत वाद घातला.त्यामुळे धूत त्यांच्या गाडीतून खाली उतरले असता संशयितांनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. याचवेळी दुसºया दुचाकीवरून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी धूत यांच्या गाडीची डाव्या बाजूची काच फोडून २१ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग काढून घेतली. त्यानंतर दोघांनीही संशयितांनी दुचाकीवर बसून रामवाडीकडे जाणाºया रस्त्याने पलायन केले. धूत यांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत संशयित पसार झाले होते.धूत यांनी घटनेची पोलिसांना माहिती देताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक सुरज बिजली, गुन्हा शाखेचे आनंदा वाघ, पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर आदींसह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मखमलाबाद नाक्यावर एका कारमधून दोन लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासणीमालेगाव स्टॅण्ड येथील चिंचबन उतारावर २१ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. यात ५० ते ५५ वयोगटांतील दोघे संशयित दुचाकीवरून जात असल्याचे दिसून येत आहे. या घटनेत दोघा संशयितांनी धूत यांच्याशी वाद घातला, तर अन्य दोघांनी पाठीमागून येत वाहनांची काच फोडून रोकड लंपास केल्याचे निष्पन्न झाल्याने या लुटीत प्रथम दर्शनी चार संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले.चोरीसाठी हेल्मेटचा आधारदुचाकीला कट का मारल्यची कुरापत काढून चारचाकीची काच फोडून लाखो रुपयांची रोकड चोरून येणाºया संशयित आरोपींपैकी एकाने हेल्मेट परिधान केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी दिंडोरीरोड कलानगर येथे पत्ता विचारण्याचा बहाणा करून सोनसाखळी चोरणाºया संशयित आरोपींनीही हेल्मेट परिधान केले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाले होते. त्यामुळे चोरटे ओळख लपविण्यासाठी हेल्मेटचा वापर करून सर्रास लूटमार करीत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत.
कारचालकाची २१ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:00 AM