शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

नाशिकमध्ये प्राणवायुच्या गळतीने घेतले २२ प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:15 AM

नाशिक : शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन कोविड रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे प्राणवायू पुरवठा ...

नाशिक : शहरातील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन कोविड रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन टाकीला लागलेल्या गळतीमुळे प्राणवायू पुरवठा खंडित होऊन तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतात बारा पुरूष आणि दहा महिलांचा समावेश असून या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी नाशिकच नव्हे तर राज्यभरात रुग्णालयांत बेड मिळत नसताना दुसरीकडे मात्र उपलब्ध ऑक्सिजनची गळती होऊन रूग्णांवर जीव गमावण्याची वेळ आल्याने व्यवस्थेचा गलथान कारभार समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेच्या उच्चस्तरीय चाैकशीचे आदेश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे तर नाशिक महापालिकेनेही पाच लाख रूपयांची मदत देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिक शहरातील द्वारका चौकानजीक असलेल्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात एकूण १५७ बेडची क्षमता असून, हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरलेले आहे. त्यात १३१ रुग्ण ऑक्सिजन आणि १५ रुग्ण व्हेंटिलेटवर होते. त्यातील ६३ रूग्ण गंभीर होते. रूग्णालयात महिनाभरापूर्वीच ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली आहे. सदर टाकी ऑक्सीजनने भरताना नोझल तुटल्याने दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही गळती सुरू झाली आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत रुग्णांचे प्राण कंठाशी आले होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे तंत्रज्ञ आणि पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी रुग्णांचे नातेवाईकही कोविड कक्षात धावले. डॉक्टर्स, कर्मचारी आणि नातेवाइकांनी छातीवर दाब देऊन रुग्णांना पंपिंग करून वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक रूग्ण अगदी नातेवाईंकासमोर दगावले. या रूग्णालयाच्या तळमजल्यावर काही ऑक्सिजन सिलिंडर असल्याचे कळल्यावर कर्मचारी व नातेवाईक ते घेऊन कक्षात धावले. दरम्यानच्या काळात दुर्घटनेची माहिती कळताच जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून तातडीने पंधरा जम्बो सिलिंडर या रूग्णालयात पाठवण्यात आले. मात्र त्यानंतरही ऑक्सिजनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने या धावपळीत २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात ११ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे.

इन्फो...

पाच रुग्णांना वाचवण्यात यश

रूग्णालयातील या दुर्घटनेनंतर प्रत्येक जण आपल्या रूग्णाला वाचवण्यासाठी धावपळ करू लागला. महापालिकेने गंभीर रूग्ण तातडीने हलवण्याची तयारी केली आणि येथील पाच रूग्ण अन्यत्र स्थलांतरित केल्याने ते मात्र बचावले. यातील चार रूग्णांना महापालिकेच्या बिटको रूग्णालयात तर एकाला समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे या धावपळीतही पाच जणांचे प्राण वाचवण्यात यंत्रणेला यश आले.

इन्फो...

वेपोरायझरकडे जाणाऱ्या पाईपला गळती

ऑक्सिजन टाकीची् गळती कशी झाली असा प्रश्न या दुर्घटनेनंतर केला जात असून, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार टाकीतून वेपोरायझरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन पाठवण्यासाठी असलेल्या पाईपलाईनला गळती लागली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सकृतदर्शनी आढळल्याचे सांगितले. या दुर्घटनेनंतर नाशिक महापालिकेने तातडीने शहरात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीच्या तंत्रज्ञांना पाचारण केले. त्यांनी तातडीने त्याठिकाणी वेल्डींग करून गळती थांबवली. पण तोपर्यंत २२ रुग्णांनी प्राण गमावले होते.

इन्फो...

नेत्यांच्या भेटी

दुर्घटनेनंतर सर्व प्रथम जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

दुर्घटनेतील मृतांची नावे अशी...

१) पंढरीनाथ नेरकर (३७),

२) भैय्या सांडुभाई सय्यद (४५)

३) अमरदीप नगराळे (७४)

४) भारती निकम (४४)

५) श्रावण पाटील (६७)

६) मोहना खैरनार (६०

७) मंशी शहा (३६)

८) सुनील झाल्टे (३३)

९) सलमा शेख (५९)

१०)आशा शर्मा (४५)

११) प्रमोद वालुकर (४५)

१२) प्रवीण महाले (३४)

१३) सुगंधाबाई थोरात (६५)

१४) हरणाबाई त्रिभुवन (६५)

१५) रजनी काळे (६१),

१६) गिता वाघचौरे (५०)

१७) बापुसाहेब घोटेकर (६१)

१८) वत्सलाबाई सुर्यवंशी (७०)

१९) नारायण इरनक (७३)

२०) संदीप लोखंडे (३७)

२१) बुधा गोतरणे (६९)

२२) वैशाली राऊत (४६)