नाशिक : शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालये तथा उच्च माध्यमिक विद्यालयांमधील अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेनंतर शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे २२ हजार २०० प्रवेश झाले असून, २४०० जागा रिक्त राहिल्या आहेत.कला, वाणिज्य व विज्ञान तसेच संयुक्त शाखा मिळून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. या मुदतीत एकूण २२ हजार २०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. नशिक शहर व देवळीली कॅम्प परिसरांतील विविध ५७ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावीच्या २४ हजार ७२० जागांसाठी २६ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले होते. यातील सात हजार ७७४ विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश झाले, तर दुसºया गुणवत्ता यादीत निवड झालेल्या सहा हजार ७३७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार २२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतले, तर तिसºया फेरीअंती १५ हजारपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत चौथ्या फेरीत २७००ने भर पडली.तीन गटांत प्रवेशप्रक्रियाचौथ्या फेरीनंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यासाठी प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य या नियमानुसार तीन गटांमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली व अंतिम टप्प्यात फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेऊन ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या संपूर्ण प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत २२ हजार २०० प्रवेश पूर्ण झाले असून, यात पुनर्परीक्षा देणाºया १४० विद्यार्थ्यांसह एटीकेटी असलेल्या ३५० विद्यार्थ्यांचाही समावेश असून, जवळपास २४०० जागा रिक्त राहिल्या आहे.
आॅनलाइनद्वारे २२ हजार विद्यार्थी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:42 AM