नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ११) एकूण २२० रुग्ण कोरोनामुक्त, तर २६२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान काल नाशिक ग्रामीणला ४, तर नाशिक मनपा क्षेत्रात २ याप्रमाणे ६ बळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या १८५२ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ७९६ वर पोहोचली असून, त्यातील ९९ हजार ४०६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.८६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.५४, नाशिक ग्रामीणला ९३.७१, मालेगाव शहरात ९२.७१, तर जिल्हाबाह्य ९१.७० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,५३८ बाधित रुग्णांमध्ये २१४१ रुग्ण नाशिक शहरात, १२१४ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५० रुग्ण मालेगावमध्ये, तर ३३ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २६६ असून, त्यातील दोन लाख ९३ हजार ९८४ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ४७९६ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,४८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.