सिन्नर : तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. परेदशातून मायदेशी परतलेल्या तालुक्यातील १५ नागरिकांसह परजिल्ह्यातून आपापल्या गावी परत आलेल्या २२०० हून अधिक जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे, मुंबई यासारख्या शहरातून आलेल्या या पाहुण्यांवर आरोग्य विभागाचा वॉच आहे.तालुक्यातील अनेकजण नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडून मुंबई, पुण्यासह राज्यातील तसेच राज्याबाहेरील अनेक शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर या स्थलांतरित कुटुंबांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपला मोर्चा पुन्हा गावाकडे वळवला आहे. मात्र, यामुळे कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होण्याचा धोकाही तितकाच वाढला आहे. गावोगावी आलेली अशी पाहुणे मंडळी आता आरोग्य विभागाच्या रडारवर आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाने गावोगावी शोधमोहीम सुरू केली आहे. विविध स्रोतांच्या माध्यमातून या पाहुण्यांचा शोध घेतला जाऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. कोण कोठून आले. कोणत्या भागात राहात होते. नोकरी, व्यवसाय काय होता, कोणत्या लोकांच्या संपर्कात येत होता याची तपशीलवार माहिती नोंदवून घेतली जात असून, अशा लोकांना होम क्वॉरंण्टाइनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्यांच्यात सर्दी, खोकला यासारखी काही लक्षणे दिसून येतात का याचेही निरीक्षण केले जात आहे. होम क्वॉरण्टाइनच सल्ला देण्यात आलेल्यांची संख्या २२०० च्या घरात आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागात जिल्ह्याबाहेरून आलेले नागरिक, कंसात परदेशातून आलेल्यांची संख्या :४दापूर आरोग्य केंद्र- ५२५ (५), देवपूर- १९५ (३), नायगाव- ४५४ (१२), पांढुर्ली- २५९ (१), ठणगाव- ५७५ (०),वावी- ३०१ (४)
२२०० नागरिक होम क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 9:52 PM
सिन्नर तालुक्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. परेदशातून मायदेशी परतलेल्या तालुक्यातील १५ नागरिकांसह परजिल्ह्यातून आपापल्या गावी परत आलेल्या २२०० हून अधिक जणांना खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे, मुंबई यासारख्या शहरातून आलेल्या या पाहुण्यांवर आरोग्य विभागाचा वॉच आहे.
ठळक मुद्देसिन्नर : परदेश दौरा करून आलेल्यांवर वॉच