नाशिक : जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दुसरीकडे २३२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना बाधितांचे प्रमाण काही प्रमाणात वाढत आहे. दिवसभरात २८२ रुग्ण नव्याने वाढले आहेत. यात नाशिक शहरात १८४ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक ग्रामीणमध्ये ७९, मालेगाव महापालिका हद्दीत ९, तर जिल्हाबाह्य दहा रुग्णांचा समावेश आहे. बरे हेाण्याचे प्रमाण कायम असून, २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, यात नाशिक शहरात दोन, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ७९८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात मार्चपासून आत्तापर्यंत ६६ हजार ८९९ रुग्ण आढळले आहेत. यातील ६४ हजार ४९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ५०३ रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत आहेत. अर्थात नाशिक शहरात पुन्हा जून ते सप्टेंबरसारखी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून, व्याधीग्रस्त रुग्णांवर विशेेष नजर ठेवण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय विभागास दिल्या आहेत.